भारतीय क्रिकेटचा सलामीवीर अंजिक्य रहाणे दुसऱ्यांदा वडील बनणार आहे. त्याने इंन्स्टाग्रामवर पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत फोटो शेयर करत ही आंनदाची बातमी दिली आहे. भारतीय क्रिकेट संघापासून दूर असणाऱ्या या ३४ वर्षीय खेळाडूसाठी ही बातमी विशेष ठरली आहे. लयीत नसल्याने त्याला इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातून संघनिवडीच्या वेळी वगळले होते.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि राधिका धोपवकर २०१४मध्ये लग्नबंधनात अडकले. या दांपत्याना २०१९मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. तर आता पुन्हा एकदा रहाणेच्या घरात लहान बाळाचा आवाज ऐकू येणार आहे. दोघांनीही आनंदाची बातमी शेयर करताना फोटोला ‘ऑक्टोबर २०२२’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले असून दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
View this post on Instagram
रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२०-२१ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजय मिळवला. त्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये लागोपाठ दोन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र त्यांनतर त्याची कामगिरीत घसरत चालली आहे. त्याने भारतीय संघासोबत शेवटचा कसोटी सामना यावर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळला आहे.
रहाणेने २०११मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ८२ कसोटी सामन्यात १२ शतके आणि २५ अर्धशतके करत ४९३१ धावा केल्या आहेत. तसेच ९० वनडे सामन्यात ३ शतके आणि २४ अर्धशतकांच्या साहय्याने २९६२ धावा केल्या आहेत. तर शेवटचा वनडे सामना २०१८मध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात त्याने नाबाद ३४ धावा केल्या होत्या.
त्याने २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केल्या आहेत. हा सामना भारताने ३३७ धावांनी जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुपर ओव्हरकडे चाललेला सामना; पण सिराजने केले असे काही की…
WIvsIND: सामना शेवटच्या चेंडूकडे जात होता अन् कोच द्रविडला घाम फुटत होता, व्हिडिओ व्हायरल
‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर






