---Advertisement---

पुजारा-विराटच्या सरासरीबाबत अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘भारतीय खेळपट्ट्या…’

On: गुरूवार, डिसेंबर 22, 2022 4:47 PM
Ajinkya-Rahane-And-Cheteshwar-Pujra
---Advertisement---

रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23च्या हंगामात द्विशतकी खेळी केल्याने अजिंक्य रहाणे चांगलाच चर्चेत आला आहे. या स्पर्धेत त्याने मुंबई संघाचे नेतृत्व करताना ही उल्लेखनीय खेळी केली. त्यामुळे त्याच्यासाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे उघडतील अशा चर्चांना उधान आले. यातच रहाणेने विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्या कसोटीतील फलंदाजी सरासरीमध्ये का घसरण झाली हे पण स्पष्ट केले आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागील अनेक महिन्यांपासून भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. तो भारताकडून केवळ या एकाच प्रकारात खेळतो. त्यामधूनही त्याला वगळले असल्याने त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हैद्राबाद द्विशतकी (204 धावा) खेळी केल्यानंतर त्याने संघसहकारी विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या फलंदाजीच्या सरासरीमध्ये भारतीय खेळपट्टींमुळे घसरण झाली, असे धक्कादायक विधान केले आहे.

घरच्या मैदानावर खेळताना खेळाडूला एक प्रकारचा लाभ होतो, मात्र रहाणेच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. रहाणेने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले, “जेव्हा सलामीवीर बाद होत होते तेव्हा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पुजारा, विराट आणि मी येत होतो. तेव्हा काही काळानंतर आम्हा तिघांचीही सरासरी घसरली आणि मी विचार केला असे आमच्या बाबतीत का होत आहे. मग कळाले की, भारतीय खेळपट्टीवर आम्हा तिघांच्या तुलनेत सलामीवीरांना फलंदाजी करणे सोपे होते, कारण खेळपट्टीच तशी होती.”

“आम्ही जेव्हा बाद होत होतो तेव्हा आम्ही काहीतरी चूक केली असेल म्हणून असे झाले असेल, मात्र प्रत्येक वेळेसच असे नाही होणार. ज्यांनी खेळपट्टी पाहिली असेल त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल, ” असेही रहाणेने पुढे म्हटले आहे.

हंगाम 2020-21 मधील पुजाराची सरासरी 47.74 होती, मात्र 16 सामन्यानंतर त्याची सरासरी 31.17 अशी झाली. विराटच्याही बाबतीत तसेच झाले. ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत त्याने केवळ एकच सामना खेळला. त्यानंतर त्यांची सरासरी 53.41 वरून थेट 28.16 आली. यादरम्यान त्याने 16 सामने खेळले होते. त्यावेळी रहाणेच्याही सरासरीमध्ये मोठी घसरण दिसली. त्याची 42.58 सरासरी 13 सामन्यांनतर 20 एवढी कमी झाली. Ajinkya Rahane explained why Virat Kohli & Cheteshwar Pujara’s average dropped

सद्य स्थितीत कसोटीमध्ये पुजाराची सरासरी 44.76, विराटची 49.35 आणि रहाणेची 38.52 एवढी आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“त्याने काय 10 विकेट आणि शतक ठोकायला हवे होते का?”; कुलदीपच्या प्रशिक्षकांचा संतप्त सवाल
उमेश-अश्विनसमोर बांगलादेश निष्प्रभ! 227 धावांवर उडाला खुर्दा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---