Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“त्याने काय 10 विकेट आणि शतक ठोकायला हवे होते का?”; कुलदीपच्या प्रशिक्षकांचा संतप्त सवाल

December 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Kuldeep Yadav Man of the match

Photo Courtesy: Twitter/imkuldeep18


बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) मीरपूर येथे सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत बांगलादेशला पहिला डावात 227 धावांवर सर्वबाद केले. मात्र, मागील सामन्यात चमकदार कामगिरी केलेला फिरकीपटू कुलदीप यादव याला या सामन्यातून बाहेर बसवले गेले. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत. त्याचबरोबर कुलदीपचे लहानपणीच्या प्रशिक्षकांनी देखील या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.

कुलदीप यादव याने (Kuldeep Yadav) चट्टोग्राम कसोटीमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 40 धावा करताना 8 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो सामनावीरही ठरला होता. त्याला संघातून बाहेर गेले गेल्याने आश्चर्य देखील व्यक्त केले जाते.‌ कुलदीपचे लहानपणीचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले,

“जो खेळाडू मागील सामन्यात सामनावीर होता त्या खेळाडूला पुढच्या सामन्यात संधी न मिळणे आश्चर्यकारक आहे. या गोष्टीचा परिणाम खेळाडूच्या मनोबलावर नक्कीच होईल. कुलदीपने दहा बळी घेऊन एखादे शतक ठोकले असते तर त्याला संघात कदाचित जागा मिळाली असती. त्याच्यावर अन्याय होण्याची ही पहिलीच वेळ नाही.”

पांडे पुढे बोलताना म्हणाले,

“आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याचा विश्वचषकासाठी विचार झाला नव्हता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध देखील त्याचे कामगिरी चांगलीच होती. मला संघ व्यवस्थापनाला प्रश्न विचारायचे नाहीत. कुलदीप अजूनही त्यांच्या संघ संयोजनात योग्य बसत नसावा.”

कुलदीपला वगळून संघ व्यवस्थापनाने या सामन्यात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत याला संधी दिली. जयदेव तब्बल बारा वर्षानंतर भारताच्या कसोटी संघात खेळत आहे.

(Kuldeep Yadav Coach Reaction After Dropping Kuldeep From Dhaka Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद 


Next Post
Ajinkya-Rahane-And-Cheteshwar-Pujra

पुजारा-विराटच्या सरासरीबाबत अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, 'भारतीय खेळपट्ट्या...'

Photo Courtesy: Twitter/IPL

'सीएसकेने माझा अपमान केला'; आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप

kapil-dev

युवा खेळाडूंवर भडकले कपिल देव; म्हणाले, 'दबाव झेपत नसेल, तर केळी विका'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143