भारतीय संघाचा अनुभवा फलंदाज आजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आहे. रहाणेने देशांतर्गत हंगामात आणि त्यानंतर आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघातील आपले स्थान देखील पुन्हा मिळवले आहे. जुने महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना खेळला जाणार आहे, ज्यासाटी राहणेला 15 सदस्यीय भारतीय संघात निवडले गेले आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी रहाणेला कटोर परिश्रम करावे लागले आहेत, जे त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर एक खास पोस्ट शेअर करून आपला अनुभव सर्वांसोबत शेअर केला. “एका प्रोफेशनल क्रिकेटचा प्रवास नेहमीच सोपा नसतो, असे मला वाटते. अनेकदा गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत आणि परिणामांच्या विचारात तुम्ही अडकून पडता. पण मी एक शिकला, ते म्हणजे नेहमी प्रोसेसवर टीकून राहिले पाहिजे आणि परिणामाचा आपल्यावर प्रभाव पडून देऊ नका. मी मागे वळून पाहिल्यानंतर असे वाटते की प्रतिकूल परिस्थितीत प्रोसेस सुरू ठेवल्यामुळे सर्वात जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. या काळात एक व्यक्ती आणि क्रिकेटपटू म्हणून मी खूप सुधारणा केल्या. ज्या काळात मी परिणामांचा विचार करत होतो, तो काळ माझ्यासाठी चांगला नव्हता, असे मला वाटते.”
“प्रोसेस पाळणे फक्त क्रिकेटसाठी गरजेचे नाहीये, इथर क्षेत्रांमध्येही याचे महत्व आहे. गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी याचा फायदा होतो. यामुळे आपल्या नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष केंद्रित राहते. जेव्हा प्रोसेस पाळतो, तेव्हा परिणामांवर जास्त लक्ष जात नाही आणि ही गोष्ट सतत काम करत राहण्यासाठी प्रेरित देखील करते.”
“एखादा खेळाडू अनेक वर्षांपासून चर्चेत असतो, त्याच्या अपेक्षा किती जबरदस्त असू शकतात, हे मला माहिती आहे. पण मी शिकलो आहे की, दबावाचा परिणाम आपल्यावर झाला नाही पाहिजे. त्या गोष्टींवर फोकस करा, ज्या आपल्या नियंत्रणात आहेत. आपल्या क्षेत्रात चांगले काम कू इच्छिणाऱ्या सर्वांना मी हाच सल्ला देईल. त्यामुळे सर्वांनी प्रोसेस पाळा आणि विश्वास ठेवा. परिणाम आपोआप येतील. मात्र, तोपर्यंत मेहनत घेत राहा आणि अधिक चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करा,” असेही अजिंक्य रहाणेने लिहिले.
दरम्यान, रहाणेने भारतीय संघासाठी त्याचा शेवटचा सामना जानेवारी 2022मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. त्याने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळले असून 209 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 52.25 राहिले असून स्ट्राईक रेट 199.04 राहिला आहे. रहाणेने भारतीय संघासाठी 82 कसोटी सामने खेळले असून यामध्ये 4931 धावा केल्या आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली, तर संघासाठी रहाणे मॅच विनिंग खेळीही करू शकतो.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी निवडलेला भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहोम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट. (Ajinkya Rahane has shared a special post about his return to the national team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीकडून मिळालेली संधी इशांत शर्माने साधली! नेट्समध्ये सराव जोरात सुरू
धक्कादायक! दिल्ली कॅपिटलच्या खेळाडूचे महिलेशी गैरवर्तन, फ्रॅंचाईजी ‘ऍक्शन मोड’वर