---Advertisement---

“त्याचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झालायं,” पाहा रहाणेबद्दल कोणी केलंय हे भाष्य

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे केले. त्याचबरोबर या सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकीय खेळी केली आणि भारतीय संघाला 8 विकेट्सने विजय मिळवून दिला. त्यानंतर अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव झाला. इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी देखील त्याची प्रशंसा केली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना दिग्गज खेळाडू इयान चॅपेल म्हणाले, “ही आश्चर्याची बाब नाही की, अजिंक्य रहाणेने मेलबर्न येथील सामन्यात भारतीय संघाचे शानदार नेतृत्व केले. कोणत्याही व्यक्तीने त्याला 2017 साली धरमशाला येथे नेतृत्व करताना बघितले असेल, तर तो व्यक्ती समजेल की, या माणसाचा जन्म क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी झाला आहे.”

धरमशाला येथे रहाणेने 2017 साली पहिल्यांदा कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते.

धरमशाला आणि मेलबर्न येथे झालेल्या दोन सामन्यांची तुलना करताना इयान चॅपेल म्हणाले,” 2017 सालच्या आणि मेलबर्न येथील सामन्या खूप साम्य होते. पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही सामने कठीण प्रतिस्पर्धी विरुद्ध होते. परत पहिल्या डावात जडेजाचे महत्वाचे योगदान आणि शेवटी अजिंक्य रहाणेची मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करताना वेगाने धावा करत फलंदाजी करणे.”

तो धाडसी आणि चलाख आहे.

माजी कर्णधार इयान चॅपेल म्हणाले, “धरमशाला येथील सामन्यात माझे लक्ष वेधले, जेव्हा अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करणार्‍या डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांना रोखण्यासाठी पदार्पण करणार्‍या कुलदीप यादवला आक्रमणासाठी बोलवले. हे एक साहसी पाऊल होते. मला वाटते, हे पाऊल हुशारीचे ठरले. यादवने वार्नरची विकेट घेतली आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या स्लिप मध्ये झेल घेतला. त्यानंतर भारतीय संघाने विजय मिळवला. हा रहाणेच्या यशाचा भाग आहे. तो धाडसी आणि चलाख आहे. ”

संघाच्या मनात त्याच्याबद्दल सन्मान वाढतो

इयान चॅपेल पुढे म्हणाले, “त्याच्या नेतृत्त्वात या दोन व्यतिरिक्त बरेच गुण आहेत. जेव्हा काही गोष्टी हातातून निसटून जात असतात, तेव्हा तो शांत राहतो. त्याने आपल्या साथीदारांचा सन्मान जिंकला आहे. जो की नेतृत्वचा सर्वात मोठा भाग असतो. तो गरजेच्या वेळी धावा काढतो. ज्यामुळे त्याच्या संघाच्या मनात त्याच्याबद्दल सन्मान वाढतो.”

महत्त्वाच्या बातम्या –

ब्रिस्बेनमध्ये नाही खेळायची टीम इंडियाला चौथी कसोटी; ऑसी खेळाडू म्हणाला, “होणार तर तिथेच”

वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १८२ धावा करत गावसकरांनी केला होता ‘हा’ विश्वविक्रम, वाचा सविस्तर

चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला केले जाणार नाही हॉटेलमध्ये कैद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---