---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १८२ धावा करत गावसकरांनी केला होता ‘हा’ विश्वविक्रम, वाचा सविस्तर

On: रविवार, जानेवारी 3, 2021 4:56 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. या क्रिकेटपटूंच्या यादीत ‘लिटल मास्टर’ सुनिल गावसकर यांचे आवर्जुन नाव घेतले जाते. याच गावसकरांनी २ जानेवारी १९७९ साली कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला होता. या विक्रमाला शनिवारी ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत.

कोलकाता येथे २९ डिसेंबर १९७८ ते ३ जानेवारी १९७९ या कालावधीत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात सलामीला फलंदाजी करताना गावसकरांनी १०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे २ जानेवारी १९७९ रोजी भारतीय संघाचा दुसरा डाव झाला. या डावातही गावसकरांनी नाबाद १८२ धावांची ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळली होती. शेवटी हा सामना अनिर्णित राहिला होता.

विशेष म्हणजे, गावसकरांची एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतके ठोकण्याची ती तिसरी वेळ होती. तत्पुर्वी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच एका कसोटी सामन्यात २ शतके करण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा एका सामन्यातील दोन्ही डावात शतके करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर झाला. कसोटीत हा शानदार विक्रम करणारे ते पहिलेच फलंदाज होते.

सुनिल गावसकर यांची कसोटी कारकिर्द

गावसकरांच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, मार्च १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला होता. तर मार्च १९८७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला. दरम्यान त्यांनी एकूण १२५ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले. त्यात गावसकरांनी ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ४ द्विशतकांचा आणि ३४ शतकांचा समावेश होता. तसेच त्यांनी कसोटी कारकिर्दीत ४५ अर्धशतकेही ठोकली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

…तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा बनू शकतो पहिलाच क्रिकेटर

मॅथ्यू वेडने घेतली ‘या’ दोन भारतीय गोलंदाजांची धास्ती, म्हणाला…

रोहित शर्मावर होतायत ‘बीफ’ खाल्याचे आरोप, सोशल मीडियावर कथित बील व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---