भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. विशेषतः भारतीय फिरकीपटूंनी दोन्ही सामन्यात उत्तम कामगिरी केली. फिरकीपटू अश्विनने दोन्ही सामन्यात स्टीव स्मिथ विरुद्ध आपला दबदबा निर्माण केला आहे. अश्विनने दोन वेळा स्टीव स्मिथला बाद केले आहे. अशातच दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडने भारतीय गोलंदाजांचे विशेष कौतुक केले आहे.
सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बोलताना वेड म्हणाला, “माझ्या मते भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे. विशेषता मेलबन ग्राउंडवर जिथे स्पिन आणि बाउंस होता तिथे त्यांनी उत्तम गोलंदाजी केली. आम्हाला वाटलं नव्हतं की विकेट अशाप्रकारे खेळेल, त्यामुळे आम्ही तिथे लवकर परिस्थितीशी एकरूप झालो नाही.”
वेड पुढे म्हणाला, “जडेजा आणि अश्विन दोघेही उत्तम गोलंदाज आहेत. दोघांचीही कामगिरी निरंतर राहिलेली आहे. आम्हाला दोघांविरुद्ध कोणतातरी नवीन मार्ग शोधावा लागेल.”
वेड पहिल्या दोन सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थित सलामीला फलंदाजीसाठी आला होता. वॉर्नरच्या पुनरागमनानंतर तो तिसऱ्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत फलंदाजीला येऊ शकतो. वॉर्नरच्या पुनरागमनाने मजबूत झाले Matthew Wade! ल्या ऑस्ट्रेलियन संघाला सिडनी येथील सामन्यात उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा बनू शकतो पहिलाच क्रिकेटर
रोहित शर्मावर होतायत ‘बीफ’ खाल्याचे आरोप, सोशल मीडियावर कथित बील व्हायरल