मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला. या सामन्यात मंगळवारी (२९ डिसेंबर) भारताने ८ विकेट्सने विजय मिळवत ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. याबरोबरच अजिंक्य रहाणे हा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवणारा पाचवाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० कसोटी सामने खेळले असून ८ सामन्यात विजय मिळवला आहे. यातील २ विजय भारताने १९७७ ला मेलबर्न येथे २२२ धावांनी तर १९७८ ला एक डाव आणि २ धावांनी सिडनी येथे बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली मिळवले.
त्यानंतर १९८१ ला मेलबर्न येथेच भारताने सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ५९ धावांनी सामना जिंकला. तर २००३ ला ऍडलेड येथे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४ विकेट्सने सामना जिंकला. यानंतर २००८ ला अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारताने पर्थ येथे ७१ धावांनी विजय मिळवला.
साल २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ऍडलेड येथे ३१ धावांनी आणि मेलबर्न येथे १३७ धावांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली देखील भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना विजयाची नोंद केली आहे.
विशेष म्हणजे रहाणेने या सामन्यात मोलाचे योगदानही दिले. त्याने पहिल्या डावात ११२ धावांची शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद २७ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
सिराजचा नेम चुकला अन् चेंडू सरळ सीमारेषेपल्याड, बघा कशा मिळाल्या कांगारूला एक्स्ट्रा धावा
डीआरएसमधील ‘अंपायर कॉल’चा आयसीसीने पुन्हा विचार करावा, सचिन तेंडुलकरची मागणी