भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पुढील महिन्यात काउंटी क्रिकेटमध्ये हँम्पशायर क्रिकेट क्लबशी जोडला जाणार आहे. तो हँम्पशायरकडून मे, जून आणि जूलैमध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळणार आहे.
30 वर्षीय रहाणे हा हँम्पशायर संघात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करमचा बदली खेळाडू म्हणून दाखल होणार आहे. मार्करमचा हँम्पशायरबरोबरील करार लवकरच संपणार आहे. तसेच त्याचा विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघात समावेश झाल्याने तो या कालावधीत काउंटीक्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही.
रहाणे हा हँम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वी हँम्पशायरकडून खेळण्यासाठी बीसीसीआयकडून परवानगी मागितली होती. त्यानंतर आता त्याला ही परवानगी देण्यात आली आहे.
रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 56 कसोटी आणि 90 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीमध्ये 40.55 च्या सरासरीने 3,400 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 9 शतकांचा आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
हँम्पशायरकडून खेळण्याबद्दल अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘मी हँम्पशायरकडून पहिला भारतीय म्हणून खेळण्यास उत्सुक आहे. मला आशा आहे की मी चांगली कामगिरी करेल आणि संघाला विजय मिळवून देईल. मला हँम्पशायरकडून खेळण्याची परवानगी देण्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो.’
सध्या रहाणे आयपीएलमध्ये व्यस्त असून तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व, असे आहेत सर्व संघ
–या क्रिकेट लीगमधून शेन वॉटसनने केली निवृत्तीची घोषणा
–आयपीएल २०१९ संपण्यापूर्वीच हे परदेशी खेळाडू परतणार मायदेशी