जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. नजीकच्या काळात 2021 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यातही पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर कसोटी संघात आमूलाग्र बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येतेय. त्यानंतर आता नव्या जागतिक कसोटी अजिंक्यपद सायकल ला सुरुवात होत आहे. या सायकलमधील पहिली मालिका भारतीय संघ वेस्ट इंडिजविरूद्ध खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे याच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाऊ शकते.
भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन कसोटी सामने खेळेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची संघनिवड जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होऊ शकते. या दौऱ्यासाठी बीसीसीआय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या अनुपस्थितीत जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातून पुनरागमन केलेल्या अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते.
सध्या चेतेश्वर पुजाराच्या भारतीय संघातील जागेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. तसेच , विराट कोहली व रोहित शर्मा यांची परदेशातील कामगिरी तितकी दमदार नाही. त्यामुळे कसोटी संघात युवा खेळाडूंचा भरणा करावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड यांना आता कसोटी संघात सामील करण्यात येऊ शकते असे देखील सूत्रांकडून समजते.
असे झाल्यास चेतेश्वर पूजारा याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची समाप्ती होऊ शकते. तसेच आगामी काळात भारतीय संघाला मोठे विजय मिळवता न आल्यास रोहित शर्मा यांच्याकडून कसोटी कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.
(Ajinkya Rahane Might Lead Indian Test Team In West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप