भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर- गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
हा मालिका विजय मिळवल्यानंतर अजिंक्य गुरुवारी (21 जानेवारी) आपल्या घरी परतला असून, त्याचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत देखील करण्यात आले. मागील बरेच महिने घरापासून दूर असलेल्या अजिंक्यने घरी परतल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अजिंक्यने लिहिले, “5 महिने, 2 देश व 8 शहर फिरल्यानंतर माझ्या आवडत्या शहरात माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवायला मिळतोय.” अजिंक्यने यावेळी आपल्या मुलीला मांडीवर घेत एक भावनिक फोटो शेअर केला आहे. अजिंक्यची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी अजिंक्यला त्याच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
5 months. 2 countries. 8 cities later, back to spending some quality time with my favourites, in my favourite city ♥️ pic.twitter.com/vdmC15esfb
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 22, 2021
आयपीएल २०२० वेळी सोडले होते घर
मागील वर्षी जूनमध्ये अजिंक्य आयपीएल २०२०साठी दुबई येथे रवाना झाला होता. आयपीएळचा हंगाम संपल्यानंतर तिथूनच तो संघासोबत जवळजवळ तीन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला होता. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर आता अजिंक्य काही दिवसांसाठी घरी परतला आहे.
त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी पुन्हा त्याला आपले घर सोडावे लागणार आहे. यावेळी क्रिकेट रसिकांना ऑस्ट्रेलियाप्रमाणे इंग्लंडविरुद्धही अजिंक्यकडून उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, ऑस्ट्रेलियात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीनंतर अजिंक्य इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये कशाप्रकारे फलंदाजी करतो?.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ