---Advertisement---

VIDEO: पत्नी आणि मुलीसह अजिंक्य रमला बालपणीच्या आठवणींत; दिली शाळेला सदिच्छा भेट

On: बुधवार, मार्च 9, 2022 10:54 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) मध्ये मुंबईसाठी खेळताना त्याची कामगिरी संमिश्र राहिली. रणजी ट्रॉफीचे साखळी सामने संपल्यानंतर तो पुन्हा एकदा मुंबईत परतला आहे. त्याने मुंबईत येताच आपली पत्नी राधिका व मुलगी आर्या यांच्यासह एका खास ठिकाणाला भेट दिली. त्याने स्वतःचे इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर केला.

रहाणे पोहोचला आपल्या शाळेत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव असलेल्या रहाणेने नुकतीच आपल्या पहिल्या शाळेला भेट दिली. डोंबिवली येथील एस.व्ही जोशी हायस्कूलला सदिच्छा भेट देत त्याने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या व्हिडिओमध्ये तो बोलताना दिसत आहे की,

https://www.instagram.com/tv/Ca327VZl6DA/?utm_medium=copy_link

“बऱ्याच दिवसांपासून मला येथे यायचे होते. कारण, इथूनच मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. याच मैदानावरून मी हा प्रवास सुरू केलेला. आता इथे बराच बदल झाला आहे. मात्र, येथे बऱ्याच वर्षाने येऊन आनंद झाला.” यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी राधिका व मुलगी आर्या सुद्धा होती. अजिंक्य त्यांना काही जुन्या गोष्टी दाखवताना दिसला.

रहाणेने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले,

‘जुन्या गोष्टी तुम्हाला जमिनीवर राहण्यास मदत करतात. आम्ही डोंबिवली येथे राहायचो आणि ही जागा माझ्या मनातून कधीही गेली नाही.’

भारतीय संघातून आहे बाहेर

सततच्या खराब कामगिरीमुळे अजिंक्य सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच त्याच्याकडून संघाचे उपकर्णधार पददेखील काढून घेण्यात आले आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावून शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र तो दोन वेळा शून्यावर बाद झाला. आगामी काळात तो कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आयपीएलमध्ये खेळताना दिसून येईल. कोलकाता संघाने त्याला यावर्षी मेगा लिलावात विकत घेतले होते.

 

BREAKING| एका वादग्रस्त कारकिर्दीची अखेर! श्रीसंतची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (mahasports.in)

हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)

नव्या कसोटी क्रमवारीत जडेजा नंबर वन! पंत-विराटही फायद्यात (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---