भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
मालिकेत अनेक वेळा अजिंक्यने आपल्या खेळ भावनेने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली. मग ते सिराजला मैदानातून बाहेर जाताना संघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे असो , अथवा युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे असो. अजिंक्यने प्रत्येक वेळी संघाला एकजूट ठेवले. अशातच भारतात परतल्यावर अजिंक्यने केलेली कृती सर्व भारतीयांना आनंद देऊन गेली. अजिंक्यने मायदेशात परतल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभादरम्यान कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार दिला. अजिंक्यच्या या कृतीचे संपूर्ण भारतवासीयांकडून कौतुक केले जात आहे.
रहाणेचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजय मिळवून परतलेल्या अजिंक्यसाठी त्याच्या शेजार्यांनी मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी पारंपारीक मराठी पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात अजिंक्यचे स्वागत करण्यात आले. या दरम्यानच जेव्हा अजिंक्यला कांगारूंची प्रतिकृती असलेला केक कापण्यात सांगितले, तेव्हा त्याने नम्रपणे त्यास नकार दिला. कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असून तो ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतीक मानला जाते. त्यामुळे त्याचा अपमान होईल, असे कृत्य करण्यात रहाणेने नकार दिला.
India's series winning captian Ajinkya Rahane receiving a grand welcome as he returns back home in Mumbai. #INDvAUS #AUSvIND pic.twitter.com/bc22dizSYL
— Gav Joshi (@Gampa_cricket) January 21, 2021
ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय –
भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका अतिशय रोमांचक होती. विशेषतः ब्रिस्बेन येथे झालेला मालिकेतील शेवटचा सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.
विशेष म्हणजे ब्रिस्बेन येथे गेल्या ३२ वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा पराक्रमही रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने केला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटपटू नाही तर ‘या’ फुटबॉलपटूने RCB संघात निवड न झाल्याने ट्विटरवर व्यक्त केली नाराजी
अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर कशी केली टीम इंडियाने ऑसींवर मात?, विहारीने केला खुलासा
कर्णधारपदासाठी वॉर्नरवर आजीवन आणि स्मिथवर केवळ २४ महिन्यांचीच बंदी का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न