भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारताला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे.
या सामन्यात भारताच्या फलंदाजांवर सगळ्यांचीच नजर असेल. विशेषतः गेल्या काही डावात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेवर कडवी टीका होत होती. मात्र या सामन्यात त्यांनी अनुक्रमे दीडशतक आणि अर्धशतक झळकावत टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले. मात्र रहाणेच्या या अर्धशतकासह एक अजब आकडेवारी देखील समोर आली आहे.
भारताची अडखळत सुरुवात
मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची पहिल्या सत्रात अडखळत सुरुवात झाली. पहिल्याच सत्रात भारताने ८६ धावांवर ३ गडी गमावले होते. परंतु सलामीवीर रोहित शर्माने अजिंक्य रहाणेच्या साथीने १६२ धावांची शानदार भागीदारी करत भारताचा डाव सावरला. गेल्या सात डावात अपयशी ठरलेल्या रहाणेने या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जबरदस्त सरासरी
पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रहाणेने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात मात्र चांगली कामगिरी केली. त्याने १४९ चेंडूत ६७ धावांची खेळी उभारली. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. एका ट्विटरकर्त्याने टाकलेल्या आकडेवारीनुसार रहाणे मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कायमच दमदार कामगिरी करतो.
कुठल्याही मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील त्याची सरासरी तब्बल ६०.२० अशी आहे. यात ६ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीत रहाणेने एकूण ३५ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यातील जवळपास निम्म्या म्हणजेच १७ वेळा त्याने ही कामगिरी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केली आहे. हे आकडेवारी चकित करणारी असली तरी भारतासाठी मात्र ती फायदेशीरच ठरली आहे.
Rahane Scores in 2nd Test of Series
132
126
118
112
108*
103
96
81
80
77
64*
59
52
51*
51
51
50* Batting1627 @60.26 with 6 Hundreds & 11 Fifties
34 scores of 50 or above in Career, half of those 17 in 2nd Test of the Series#INDvENG
— Vidhu Pal (@vidhu_pal) February 13, 2021
दरम्यान, सामन्याचे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ५ बाद २७१ धावा झाल्या होत्या. रोहित शर्मा दीडशतक करून आणि अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकावून माघारी परतले होते. त्यामुळे रिषभ पंत १३ तर आर अश्विन ९ धावांवर खेळत होते.
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडसह या ४ संघांविरुद्ध रोहितचा दबदबा, फक्त कसोटी नव्हे तर टी२० आणि वनडेतही केलीय सेंचूरी
युवा खेळाडूंसाठी खुशखबर! आता या राज्यांमध्येही सुरू होणार एमएस धोनी क्रिकेट अकादमी