भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना सुरू असून आज (०६ मार्च) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या दिवसाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्या मजबूत भागिदारीने भारतीय संघाला पहिल्या डावात १६० धावांची आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांचा पुन्हा एकदा फ्लॉप शो पाहायला मिळाला. दरम्यान भारतीय खेळाडूंनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दमदार करत असताना अजिंक्य रहाणेने अप्रतिम झेल पकडत सर्वांचे लक्ष वेधले.
झाले असे की, इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स डॅनियल लॉरेन्ससोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. अशात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्यांची जोडी तोडण्यासाठी फिरकीपटू अक्षर पटेलकडे डावातील ४४ वे षटक सोपवले. अक्षरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फोक्स आउटसाइड एजला चौकार खेचायला गेला. परंतु आधीपासूनच भारताचा उपकर्णधार रहाणे तिथे सावध उभा होता.
रहाणेने चेंडू आपल्याकडे येताच डाव्या अंगास डाईव्ह मारली आणि अगदी मैदानालगत चेंडू असताना झेल पकडला. यावेळी त्याने झेल पकडायच्या आत चेंडूने मैदानाला स्पर्श केला का नाही?, ही शंका उपस्थित झाली. अखेर थर्ड अंपायरनी तपासणी केल्यानंतर कळाले की, रहाणेने चेंडू मैदानावर पडायच्या आतच झेल घेतला होता. अशाप्रकारे फोक्स ४६ चेंडूत १३ धावा काढत झेलबाद झाला.
#INDvENG #Rahane #masscatch #fileding @ajinkyarahane88 @RanjiKerala pic.twitter.com/ogDS7us16j
— Midhun Palayadan (@MidhunPalayada1) March 6, 2021
Honest Man Rahane wasn't sure of the catch but replays confimed it's OUT…. 3 to go #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/BKKqV8HQJo
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) March 6, 2021
या सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावातही रहाणेने फोक्सचा आर आश्विनच्या गोलंदाजीवर झेल घेतला होता. रहाणेचा हा कसोटी कारकिर्दीतील ९२ वा झेल होता. या झेलासह त्याने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे. त्याने ९१ झेल घेणाऱ्या माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला मागे टाकले होते. आता पुन्हा दुसऱ्या डावात फोक्सचा आणि त्यापुर्वी झॅक क्राउलेचा झेल त्याने एकूण ९४ झेलांची खात्यात नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजब! डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पंतने चेंडू छातीवर घेत ओली पोपला पाठवले तंबूत, पाहा व्हिडीओ
अन् सिब्लीच्या कॅचने सर्वांना झाली चेन्नई कसोटीतील पुजाराच्या विकेटची आठवण, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ: तू यष्टीमागे इतकी बडबड का करतो? रोहितच्या प्रश्नावर रिषभचे मन जिंकणारे उत्तर