येत्या महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (आयपीएल २०२२, IPL 2022) हंगाम रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या हंगामाचा मेगा लिलाव बंगळुरू येथे झाला आहे. या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्ससह सर्व १० संघांनी मोठमोठ्या खेळाडूंना विकत घेत संघाला मजबूत बनवले आहे. यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघातून मोठी बातमी पुढे येत असून त्यांनी भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजीत आगरकर (Ajit Agarkar)यांना आपल्या संघासोबत जोडले आहे.
आगरकर यांना दिल्ली संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्त (Delhi Capitals Assistant Coach) करण्यात आले आहे. दिल्ली संघाने बुधवारी (२३ फेब्रुवारी) यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. आगरकर सध्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी२० आणि कसोटी मालिकांमध्ये समालोचकांच्या पॅनेलचा भाग आहेत. त्यामुळे या मालिका संपल्यानंतर ते दिल्ली संघासोबत जोडले जातील. आगरकरांपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ या पदी कार्यरत होते.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
Former 🇮🇳 fast bowler @imAagarkar has joined the Delhi Capitals coaching staff as an Assistant Coach 🤩
Welcome to DC 💙
🔗 https://t.co/mCEmYM0MPE#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/91D0Eejlbf
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 23, 2022
४४ वर्षीय आगरकर दिल्ली संघाकडून मिळालेल्या या जबाबदारीबद्दल बोलताना म्हणाले की, “मी आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग बनून खूप आनंदी आहे. मी खूप नशीबवान आहे की, खेळाडूनंतर मी एका वेगळ्या भूमिकेत दिल्ली संघात परतणार आहे. हे निश्चितपणे खूप रोमांचक आहे. आमच्याकडे युवा आणि शानदार संघ आहे, ज्याचे नेतृत्त्व प्रतिभाशाली क्रिकेटपटूंपैकी एक असलेला रिषभ पंत करतो आहे.”
🎥 | First words from our new Assistant Coach 🗣️
How excited are you about @imAagarkar's arrival into the DC coaching setup? 💙💬#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/HNtRUqzVvx
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 23, 2022
Back in the Delhi blue 💙
Can't wait to have you in the camp, @imAagarkar 🤝#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/eKJ9tnKSsk
— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 23, 2022
पुढे दिल्ली संघाच्या मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्याबद्दल बोलताना आगरकर म्हणाले की, “प्रशिक्षक पाँटिंग या खेळातील महान खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
दिल्लीकडून खेळला होता शेवटचा आयपीएल सामना
दरम्यान आगरकरांनी २००८ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तर २०१३ साली दिल्ली संघाकडून कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला होता. यादरम्यानच्या कालावधीत त्यांनी ४२ सामने खेळताना २९ विकेट्स घेतल्या होत्या.
दिल्ली संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत
दरम्यान दिल्ली संघाने पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली गेल्या २ वर्षात अतिशय प्रभावी प्रदर्शन केले आहे. २०२० मध्ये दिल्लीचा संघ उपविजेता राहिला होता. तर आयपीएल २०२१ मध्येही त्यांनी प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला होता. अद्याप या संघाला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. परंतु त्यांचे मागील २ वर्षांतील प्रदर्शन पाहता, हा संघ यंदा ट्रॉफीची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’
संजू सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी निवड निश्चित? कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतोय पाहा
रश्मिका मंदानासोबता रोमान्स करताना दिसला डेविड वॉर्नर, व्हिडिओ होतोय व्हायरल