India’s Fast Bowler Mohammed Shami Ruled Out Of England Test Series: पुढील महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असेल. यावेळी दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. त्यासाठी बीसीसीआयने शनिवारी (24 मे) भारतीय संघाची घोषणा केली. यादरम्यान भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा शबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. (Shubman Gill named India’s Test captain) या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर अनेक मोठे खेळाडूही पुनरागमन करण्यात यशस्वी झाले आहेत.
परंतु दुखापतीतून परतलेला स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आगामी दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. (Mohammed Shami not selected in Indian team) त्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडला असेल की, त्याला भारतीय संघात संधी का मिळाली नाही? जर तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर चला या बातमीद्वारे आपण जाणून घेऊयात.
पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्नांची उत्तरे देताना मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, “वैद्यकीय पथकाने सांगितले आहे, की तो या मालिकेतून बाहेर आहे. तो आगामी मालिकेसाठी तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गेल्या आठवड्यात त्याला काही समस्या आल्या. त्यानंतर त्याने एमआरआय केला. मला वाटत नाही की तो संपूर्ण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकेल. आम्हाला आशा होती की तो काही सामन्यांसाठी उपलब्ध असेल. परंतु जर तो वेळेवर तंदुरुस्त होऊ शकला नाही तर वाट पाहणे खूप कठीण होईल. हे आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे. कारण आम्हाला नेहमीच त्याच्यासारख्या गोलंदाजाची संघात निवड करायची असते.” (Ajit Agarkar reacts to Mohammed Shami not being selected in the team)
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा 18 सदस्यीय संघ– शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
— BCCI (@BCCI) May 24, 2025
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq