---Advertisement---

धवनचे स्थान धोक्यात; ‘हे’ दोन खेळाडू सलामीला फलंदाजी करण्याच्या शर्यतीत पुढे, दिग्गज भारतीय क्रिकेटरचे मत

On: बुधवार, जुलै 14, 2021 4:00 PM
---Advertisement---

येत्या काही दिवसात भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांचा थरार रंगणार आहे. ही मालिका आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मिळण्यासाठी मदत होणार आहे. परंतु, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी डावाची सुरुवात कोण करणार? भारतीय संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी काही फलंदाजांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच माजी भारतीय गोलंदाज अजित आगरकरने टी -२० विश्वचषक स्पर्धेत सलामी फलंदाजी कोण करेल याबाबत आपले मत मांडले आहे.

हे दोन खेळाडू सर्वात पुढे
आगरकरच्या मते रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही सलामीला फलंदाजी करण्याच्या शर्मयतीत शिखर धवनच्या पुढे आहेत. तरीदेखील श्रीलंका दौऱ्यावर धवनने चांगली कामगिरी करणे आणि स्वतःला मजबूत ठेवणे आवश्यक आहे.

आगरकर म्हणाला,”राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला त्यानंतर तो बाहेर झाला होता. त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन करत वनडे मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने गेल्या २ आयपीएल हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तो काहीच चूक करत नाही. मला वाटते की केएल राहुल त्याच्यापेक्षा पुढे आहे. तसेच मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा स्वतःसोबत फलंदाजी करण्यासाठी केएल राहुलला संघात स्थान देईल.”

धवनला धावा करण्याची आवश्यकता
आगरकरने पुढे म्हटले,की “हा खरंच एक धाडसी निर्णय आहे. असे जाणवत आहे की, राहुल आणि रोहित हे शिखर धवनपेक्षा खूप पुढे आहेत. परंतु, शिखर धवनने धावा केल्या आहेत. त्यामुळे धवनने त्या दोघांवर दबाव बनवून ठेवायला हवा. पण त्याला धावा कराव्या लागतील. त्याला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक खेळाडू म्हणून तुम्ही इतके, तर नक्कीच करु शकता. मला नाही माहित की, टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करताना श्रीलंकेतील कामगिरीचा किती फायदा होणार आहे. पण श्रालंकेतील कामगिरीमुळे तुम्ही समोरच्यावर नक्कीच दबाद टाकू शकता.” (Ajit Agarkar said now Shikhar Dhawan has less chances to play In T20 world cup)

येत्या १८ जुलै पासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. या दौऱ्यावर शिखर धवनलाही स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

यशपाल शर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला होता घाम, पाहा त्यांनी मारलेला गगनचुंबी षटकार

धोनी तो धोनीच!! आधी फ्लिंटॉफचा बाऊन्सर आदळला धोनीच्या हेल्मेटला, मग काय ‘कॅप्टनकूल’ने दिले त्याच्या शैलीत उत्तर

टेस्ट चॅम्पियनशीप २०२१-२३: भारत ‘या’ सहा संघाविरुद्ध करणार दोन हात, पाहा कसे दिले जाणार यंदा गुण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---