आयपीएल 2025 नंतर टीम इंडियाला (team india)इंग्लंडच्या दौऱ्यावर जायचे आहे. ज्याविषयी आज टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (ajit aagarkar) यांनी 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी निवृत्तीनंतर (test cricket retirement) आता शुबमन गिल (shubman gill) टीम इंडियाचा नवा कर्णधार बनला आहे. अजित आगरकर यांनी प्रेस कॉन्फरन्स मधून टीम इंडियाची घोषणा केली आहे. तसेच आगरकर यांनी विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीवर (virat kohli test cricket retirement) देखील भाष्य केले आहे.
टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराटने 12 मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेट कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. प्रत्येक जण या निवृत्तीमुळे आश्चर्यचकित होता. त्याच निवृत्तीबद्दल अजित आगरकर यांनी सांगितले विराटने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आमच्याशी संपर्क केला होता आणि त्याने म्हटले होते की, त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती (Test cricket) घेण्याचा विचार केलेला आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा एक मोठा खेळाडू होता आणि त्याची जागा घेणे कुणालाही सोपे जाणार नाही.
अजित आगरकर म्हणाले, हा एक मोठा बदल आहे कारण विराट कोहली आणि रोहित शर्माने संघातून बाहेर होण्याचा निर्णय घेतला आहे. ते हे देखील म्हटले की, इंग्लंड विरुद्ध मालिका एक मोठे आव्हान असेल आणि गिलला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील.
5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे स्क्वाड:
शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव






