कोरोना व्हायरस या जागतिक साथीच्या रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वजण आवश्यक ती काळजी घेत आहेत. त्याबरोबरच सुरक्षिततेचा पर्याय म्हणून सर्व क्रीडा स्पर्धाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे खेळाडू आपापल्या घरात परिवारासोबत वेळ घालवण्याबरोबरच सोशल मीडियावरही व्हिडिओ, फोटो पोस्ट करत आहेत. असाच भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) मुलीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
रहाणेची पत्नी राधिकाने (Radhika Rahane) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपली मुलगी आर्याचा (Aarya) एक छानसा व्हिडिओ शेअर केला आहे. राधिकाने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आर्यालाही माहिती आहे. घरात राहा. सुरक्षित राहा.” या व्हिडिओमार्फत त्यांनी सर्व चाहत्यांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
https://www.instagram.com/p/B-ufDelARln/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओमध्ये रहाणे बसला आहे आणि आर्या बेडवर झोपली आहे. मराठीत रहाणे आर्याला घराच्या बाहेर पडायचे का? असे विचारत आहे. यावर आर्या मान हलवत नाही म्हणत आहे.
आर्या आणि रहाणेच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
रहाणेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक प्रश्नोत्तरांचे सत्र ठेवले होते. यादरम्यान चाहत्यांनी त्याला मजेशीर प्रश्न विचारले. या प्रश्नांचे उत्तरही रहाणेने दिले. यावेळी रहाणेने लॉकडाऊनच्या काळात त्याच्या दररोजच्या कामांबद्दलही सांगितले आहे.
रहाणेने यावेळी सांगितले की, तो सकाळी ५ वाजता उठतो, वाचन करतो, व्यायाम करतो, पत्नी राधिकाची मदतही करतो, आर्याबरोबर खेळतो. याबरोबरच व्हिडिओ कॉलवरून आपल्या आई-वडिलांची विचारपूसही करतो. तसेच काहीवेळा जेवणही बनवतो.
कोरोना व्हायरसच्या लढाईत रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १० लाख रुपयांची मदत केली होती.
भारतात सध्या जवळपास ५७३४ लोकांना कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे. तर १६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर ४७४ लोक यामधून बरे झाले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रविंद्र जडेजाची नक्कल केलेला डेविड वाॅर्नरचा व्हिडीओ आला समोर
-या भारतीय गोलंदाजाला खेळणे महाकठीण- स्टिव स्मिथ
-आता भारत- पाकिस्तान नाही तर या दोन दिग्गजांच्या मुलांत होणार सामना