Akash Ambani On Rohit Sharma Future: 19 डिसेंबर हा दिवस अनेक खेळाडूंचे नशीब बदलवणारा ठरला. कारण, याच दिवशी दुबईत आयपीएल 2024 लिलाव पार पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना बेस प्राईजच्या दुप्पट-तिप्पटच काय, तर 10 पटींनी पैसा मिळाला. मुंबई इंडियन्स संघानेही या लिलावात 4 खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली. मात्र, लिलाव सुरू असताना मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांना रोहित शर्माशी संबंधित प्रश्नाचाही सामना करावा लागला. याचे उत्तरही त्यांनी दिले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024 Auction) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे मालक आकाश अंबानी (Akash Ambani) यांना एका चाहत्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचे आकाश यांनी समंजस्यपणे उत्तर दिले. याविषयी सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत आहेत.
काय होता प्रश्न आणि काय म्हणाले अंबानी?
खरं तर, माध्यमांशी बोलताना एका व्यक्तीने थेट रोहित शर्माविषयी प्रश्न विचारला. तो म्हणाला की, “रोहितला परत आणा.” या व्यक्तीचा प्रश्न ऐकताच आकाश अंबानी यांनी प्रतिक्रिया देत मजेशीर अंदाजात म्हटले की, “चिंता करू नका तो फलंदाजी करेल.”
𝘊𝘩𝘪𝘯𝘵𝘢 𝘮𝘢𝘵 𝘬𝘢𝘳𝘰 𝘸𝘰𝘩 𝘣𝘢𝘵𝘵𝘪𝘯𝘨 𝘬𝘢𝘳𝘦𝘨𝘢 💙#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/fNWLiWpgJS
— Mumbai Indians (@mipaltan) December 19, 2023
खरं तर, मुंबई इंडियन्सनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षावही करत आहेत. एकाने लिहिले की, “यावरू स्पष्ट होते की, रोहित मुंबईसाठी खेळेल. ट्रेड होणार नाही.” आणखी एकाने कमेंट केली, “धन्यवाद देवा, तो असे म्हणाला नाही की, रोहित वॉटर बॉय बनेल.” एक तर असेही म्हणाला की, “आणि नेतृत्व करून हार्दिक हरवेल?”
मुंबईची खरेदी
आयपीएल 2024 मिनी लिलावात (IPL 2024 Mini Auction) मुंबईने एकूण 8 खेळाडूंना खरेदी केले. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याला मुंबईने सर्वाधिक 5 कोटी दिले. लिलावात मुंबईने गेराल्डव्यतिरिक्त, नुवान तुषारा (4.8 कोटी), दिलशान मदुशंका (4.6 कोटी), मोहम्मद नबी (1.50 कोटी), श्रेयस गोपाळ (20 लाख), नमन धीर (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख) आणि शिवालिक शर्मा (20 लाख) या खेळाडूंना संघाचा भाग बनवले. (akash ambani on rohit sharma mumbai indians future said this)
हेही वाचा-
‘माझ्या आधी 5 खेळाडू Unsold गेल्यामुळे मी लोडमध्ये होतो’, 8.4 कोटीत CSKमध्ये गेलेल्या खेळाडूचे विधान
“जर हा भारतीय खेळाडू लिलावात आला असता, तर 42 कोटी रुपये मिळाले असते”