भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल बघायला मिळाले. हार्दिक आणि कंपनीने यजमान संघाला 65 धावांनी पराभूत करत या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. हे दोन्ही संघ आता 22 नोव्हेंबरला नेपियर येथे आमनेसामने असतील. दुसऱ्या टी20 सामन्यात हार्दिक पांड्याने विस्फोटक फलंदाज रिषभ पंत याला सलामीवीर म्हणून संघात जागा दिली. पंत या सामन्यात देखील अपयशी ठरल्याने क्रिकेट समालोचक आकाश चोपरा यांनी पंतवर सडकून टीका केली आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) मागच्या काही काळापासून आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. यामुळे त्याला टी20 विश्वचषकात देखील जास्त संधी मिळाल्या नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र, तो आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर बऱ्याच लोकांनी सल्ला दिलेला की त्याला सलामीवीरीच्या भुमिकेत संधी देण्यात यावी पण इकडेही त्याच्या हाती निराशाच आली. या गोष्टीवर माजी भारतीय खेळाडू व क्रिकेट समालोचक आकाश चोपरा (Akash Chopra )यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
तुम्हाला वाटतय की पंत ओपनिंग करु शकतो?- आकाश चोपरा
न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रिषभ पंत याला सलामीवीराच्या भुमिकेत उतरवले गेले. यावर आकाश चोपरा याने वक्तव्य केले. यावर तो म्हणाला की,”भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रिषभ पंत एक शॉट मारुन तंबूत परतला. हे सर्व पाहिल्यानंतरही तुम्हाला वाटतय की तो ओपनिंग करु शकतो. या ठिकाणी हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे की तुम्ही पंतला सलामीसाठी तो सलामीवीर म्हणून यशस्वी व्हावा म्हणून पाठवताय की तो तुमचा सर्वोत्कृष्ट सलामीवीर आहे? ”
न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे वर्चस्व राहीले. सूर्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 191 धावसंख्येपर्यंत मजल मारली. सूर्या वगळता कोणताही भारतीय खेळाडू 40च्या आकड्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्याने फक्त 51 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 111 धावांचा धडाकेबाज डाव खेळत या सामन्याचा नायक ठरला. भारताने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला किवी संघ 126 धावातच गारद झाला.(Akash Chopra criticized Rishabh Pant on his performance as a opener)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पूरनची हकालपट्टी? वेस्ट इंडीजला मिळणार नवा कर्णधार; आयपीएल गाजवलेल्या खेळाडूला मिळू शकते जबाबदारी
स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला…