---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला आणखी एक धक्का, बुमराहनंतर आणखी एक गोलंदाज संघाबाहेर!

On: गुरूवार, जानेवारी 9, 2025 10:00 AM
akash deep
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला सतत अडचणी येत आहेत. दुखापतीमुळे मोहम्मद शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. अलीकडेच, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही दुखापत झाल्याची बातमी समोर आली. आता भारतीय संघातील आणखी एक वेगवान गोलंदाज अनफिट असल्याची बातमी समोर आली आहे. तो गोलंदाज म्हणजे आकाश दीप. तिन्ही गोलंदाजांच्या दुखापतीमुळे भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणावर मोठा परिणाम होऊ शकतो.

पाचव्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज आकाश दीपला पाठीची दुखापत झाली होती, याची पुष्टी माजी क्रिकेटपटू तथा हेड कोच गौतम गंभीरने केली. बीजीटीच्या शेवटच्या कसोटीत त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला. आता बातमी अशी आहे की दुखापतीमुळे आकाश दीप विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत सहभागी होऊ शकणार नाही. अहवालानुसार, आकाश दीप बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये जाणार आहे. आकाश दीपने 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 2 कसोटी सामने खेळले. या दोन कसोटी सामन्यांच्या 4 डावात त्याने 5 बळी घेतले.

वृत्ता अहवालानुसार, जसप्रीत बुमराह 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडू शकतो. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल संघ व्यवस्थापनालाही चिंता आहे. या अहवालात म्हटले आहे की बुमराहची या स्पर्धेसाठी संघात निवड होऊ शकते, परंतु तो सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. तो बाद फेरीत परतेल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या एका वृत्तानुसार, बुमराह लवकरच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाचा आणि त्याच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेईल. 2022 मध्ये त्याला शेवटची दुखापत झाली होती. तेव्हा त्याची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये झाली होती.

हेही वाचा-

BGT जिंकताच ऑस्ट्रेलियाने बदलला कर्णधार, श्रीलंका दाैऱ्यासाठी या अनुभवी खेळाडूला मिळाली संघाची कमान
‘सत्याला कोणत्या स्पष्टीकरणाची…’, चहलसोबत घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच बोलली धनश्री वर्मा!
या वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट समोर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---