आयपीएल २०२२च्या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्स संघाने एका नवख्या खेळाडूला ताफ्यात सहभागी केले आहे. दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झालेल्या सूर्यकुमार यादव याच्याजागी आकाश मधवाल याला बदली खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. सोमवारी (१६ मे) आयपीएलच्या वेबसाइटवर यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्स संघाचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएल २०२२च्या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. सूर्यकुमारच्या डाव्या हाताचे पुढील स्नायू ताणल्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला आहे. अशात त्याचा बदली खेळाडू म्हणून मुंबईने आकाशला संघात सामील केले आहे.
NEWS – Akash Madhwal joins Mumbai Indians as a replacement for Suryakumar Yadav.
READ – https://t.co/zdoOFxLDeU #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2022
आकाश मध्यमगती गोलंदाज असून तो २८ वर्षांचा आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तराखंड संघाचे प्रतिनिधित्त्व करतो. त्याने आतापर्यंत उत्तराखंड संघाकडून १५ टी२० सामने खेळताना २६.६० च्या सरासरीने १५ विकेट्सही घेतल्या आहेत. मुंबईने त्याला २० लाखांच्या किंमतीला संघात घेतले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत
क्रिजच्या एकाच बाजूला दोन्हीही फलंदाज, अश्विनच्या चुकीमुळे नीशमला पकडावा लागला पव्हेलियनचा रस्ता
अकाली निधनाचा धक्का पचवणे कठीण, अँड्र्यू सायमंडच्या बहिणीची पोस्ट होतेय व्हायरल