मुंबई इंडियन्ससाठी आकाश मथवाल यावर्षी हुकमी एक्का ठरला आहे. माथवल पुन्हा एकदा संघासाठी महत्वपूर्ण विकेट्स घेऊ शकला. इंडियन प्रीमियर लीग 2023चा एलिमिनेटर सामना बुधवारी (24 मे) मुंबई इंडियन्स आणि लकनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. माधवालने आपल्या संघाला गरज अशताना लागोपाठ चेंडूंवर विकेट्स घेतल्या. या विकेट्ससाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयपीएल 2023 मध्ये खेळपट्टी फलंदाजीसाठी आनुकूल राहिली आहे. अशात नाणेफेक जिंकणारा संघ बहुतांश वेळा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना दिसला. मात्र, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एलिमिनेटर सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये मुंबई संघ 8 भाद 182 धावा करू शकला. प्रत्युत्तरा लखनऊचे फलंदाज हे लक्ष्य गाठतील असे वाटत होते. मात्र, लखनऊच्या फलंदाजांनी देखील एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. वेगवान गोलंदाज आकाश मधवाल (Akash Madhwal) याने डावातील दहाव्या षटकात मुंबईला विजयाचा जवळ नेऊन ठेवले.
निकोलस पुरन आणि निकोलस पुरन या दोन महत्वाच्या विकेट्स आकाशने या षटकात घेतल्या. षटकातील चौथ्या चेंडूवर आकाशने बदोनीचा त्रिफळा उडवला. तर पुढच्याच चेंडूवर निकोलस पुरन गोल्डन डकवर तंबूत परतला. पुरनने आपल्या डावातील पहिल्या चेंडूवर यष्टीरक्षक ईशान किशन याच्या हातात विकेट गमावली. या षटकात आकाशकडे हॅट्रिकची संधी होती, पण त्याला हे साध्य करता आले नाही. असे असले तरी, आपल्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा सामना आकाशने बुधवारी खेळला, असे आपण म्हणू शकतो.
Ayush Badoni 🙌
Nicholas Pooran 😯Two outstanding deliveries from Akash Madhwal to get two BIG wickets 🔥🔥#LSG 75/5 after 10 overs
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1wG31#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/smlXIuNSXc
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
आकाश मधवाने या षटकात 3.3 षटके गोलंदाजी केली आणि सर्व विक्रम मोडीत काढले. आपल्या कोट्यात अवघ्या 5 धावा खर्च करून आकाशने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या आहेत. एखाद्या अनकॅप्ड भारतीय गोलंदाजाकडून आयपीएलमध्ये केले गेले हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. सोबतच जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रमही मोडला. बुमराहने यापूर्वी सर्वात कमी 10 धावा देत पाच आयपीएल विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, आकाशने लखनऊविरुद्ध फक्त 5 धावा देत पाच विकेट्सचा हॉल नावावर केला आहे. (Akash Madhwal took the wickets of Ayush Badoni and Nicholas Pooran on consecutive balls)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आकाश मधवालचा चमत्कार! 5 विकेट्स काढत मुंबईला मिळवून दिलं Qualifier 2 चं तिकीट, लखनऊ IPLमधून बाहेर
मुंबई अडचणीत असताना पंचांनी दिला वादग्रस्त निर्णय! ऑस्ट्रेलियन फलंदाजही नाखुश