भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्च रोजी सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नाही. फिटनेसच्या कारणास्तव त्याला या सामन्यात सहभाग घेता आला नव्हता. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
माध्यामांमध्ये असे वृत्त आहे की, अक्षर पटेल (Axar Patel) आता दुखापतीतून सावरला आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी तो संघात पुनरागमन करू शकतो. अक्षर पटेल यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामना, अक्षरचा शेवटचा सामना होता. त्यानंतर तो दुखापतीशी झगडत आहे.
बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी २० फेब्रुवारीला संघाची घोषणा केली होती. त्यावेळी बोर्डने माहिती दिली होती की, अक्षर पटेल सध्या त्याच्या रिहॅबिलिएटेशनचा कालावधी पूर्ण करत आहे. याच कारणात्सव श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात निवड होण्यासाठी तो उपलब्ध नाहीय. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याची निवड करण्याविषयी विचार केला जाईल.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामना १३ मार्चपासून सुरू होईल. हा सामना मोहालीत सुरू असलेल्या सामन्यासारखा नसून दिवस-रात्र खेळला जाणार आहे. तसेच सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जाणार आहे.
उभय संघात सध्या झालेल्या मोहाली कसोटी सामन्यात. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ पहिल्या डावात अवघ्या १७४ धावा करून सर्वबाद झाला. भारताने पहिल्या डावात ४०० धावंची आघाडी घेतली आणि श्रीलंकेला फॉलोऑन (पुन्हा फलंदाजी करण्याची संधी) दिला. पण दुसऱ्या डावातही श्रीलंका संघ १७८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या –
रविंद्र जडेजासोबत शेन वॉर्नचे नाते होते खूप खास, सीएसकेने शेअर केला जुना फोटो
दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा
अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी