विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यातून सावरण्यासाठी भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत. २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मोठ्या मालिकेपूर्वी माजी इंग्लिश कर्णधाराने भारतीय संघाच्या कमकुवत पक्षाबाबत भाष्य केले आहे.
इंग्लंड संघाचा माजी कर्णधार ॲलेस्टर कूक याचे असे म्हणणे आहे की, चेंडू हवेत फिरायला सुरुवात झाली की भारतीय संघातील फलंदाज अडचणीत येतील. कूकने म्हटले की, “भारतीय संघ एक उत्कृष्ट संघ आहे. परंतु चेंडू हवेत फिरायला लागला तर मात्र इंग्लंडचे गोलंदाज त्यांच्यावर पकड बनवू शकतात. ऑगस्टमध्ये परिस्थिती अशी असेल आणि खेळपट्टीवर ओलावा असेल तर, इंग्लंड संघ या सामन्यात भारी पडू शकतो.” (alaister cook statement before india vs england test series)
स्विंग होणारे चेंडू भारतीय संघाला टाकणार अडचणीत
ॲलेस्टर कूकने पुढे म्हटले की, “भारतीय संघात विश्वस्तरीय फलंदाज आहेत. परंतु स्विंग आणि सीम होणारे चेंडू हा त्यांचा कमकुवत पक्ष आहे. त्यामुळे इंग्लंड संघ त्यांच्यावर दबाव बनवण्यात यशस्वी होऊ शकतो. ”
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत बोलताना कूक म्हणाला, “सामन्याच्या तीन दिवसांपूर्वी संघाची निवड करणे आणि दोन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवणे आत्मविश्वासी निर्णय होता. त्यांना ठाऊक होते की, सामन्यादरम्यान पाऊस पडेल. तसेच सराव सामना खेळायला न मिळणे हेदेखील एक प्रमुख कारण होते.”
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या-
टेनिस प्रेमी शास्त्री गुरुजी! फेडररचा सामना पाहण्यासाठी पोहोचले सेंटर कोर्टवर, ट्विट केले छायाचित्र
वेध ‘माही’च्या वाढदिवसाचे! जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशीच धोनी ट्रेंडमध्ये, पाहा काही खास पोस्ट