---Advertisement---

पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! भारतीय संघाच्या सराव सत्रात चौकार-षटकारांचा पाऊस

On: सोमवार, फेब्रुवारी 17, 2025 4:04 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह भारतीय संघाचे सर्व खेळाडू सोमवारी सरावासाठी मैदानात उतरले होते. भारताचा पहिला सामना (20 फेब्रुवारी) रोजी बांग्लादेशसोबत असणार आहे. यादरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने स्वतःवरती आणखीन काम केले.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध असणार आहे, जो (20 फेब्रुवारी) रोजी खेळला जाईल. याचसाठी सोमवारी दुबई येथे विराट कोहली, रोहित शर्मा सोबतच संपूर्ण भारतीय संघ सरावासाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान रोहित आणि पांड्याने विविध शॉट्सवरती काम केले आहे, तसेच विराट कोहलीने फुटवर्क बाबतीत आणखीन दक्षता घेतली आहे.

बीसीसीआयने ट्विटरद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये भारतीय संघ सराव करताना दिसत आहेत. रोहित शर्माने सरावादरम्यान मैदानावरती भरपूर घाम गाळला आहे हे दिसून आले. रोहितने अनेक गोलंदाजांचा सामना देखील केला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा फिरकीपटू‌ सोबतच वेगवान गोलंदाजांचा देखील सामना करताना दिसला.

या दरम्यान विराट कोहलीने शुबमनला काही फायदेशीर सल्ले देखील दिले. धमाकेदार फलंदाज श्रेयस अय्यरने देखील सरावात भरपूर कष्ट घेतले आहेत.श्रेयसने सरावादरम्यान मोठ्या हिट्स वरती काम केले आहे. त्याचबरोबर विराटने आपल्या फूटवर्कवरती लक्ष केंद्रित केले आहे. सगळ्याच बाबतीत भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूचा घटस्फोट, 14 वर्षांच्या नात्याला झाला अंतिम विराम

वानखेडे स्टेडियममध्ये MI चाहत्यांसाठी मेजवानी! IPL 2025 ची संपूर्ण माहिती

Birthday; एबी डिव्हिलियर्सच्या विस्फोटक फलंदाजीचे 3 विक्रम, जे आजही अभेद्य आहेत!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---