इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकचा (Alastair Cook) विश्वास आहे की फॉर्ममध्ये असलेला जो रूट (Joe Root) येत्या काही वर्षांत सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 15,921 कसोटी धावांच्या रेकाॅर्डच्या अगदी जवळ येऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला मुलतान येथे इंग्लंड-पाकिस्तान संघातील पहिल्या कसोटीत कूकला मागे टाकत अलीकडेच, रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा आणि शतके ठोकणारा खेळाडू बनला.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेल्या ॲलिस्टर कूकने (Alastair Cook) आयसीसीने आयोजित केलेल्या राउंड-टेबल मुलाखतीदरम्यान सांगितले की, “मला वाटतं जो रूट (Joe Root) निश्चितपणे इंग्लंड संघासाठी एक रेकॉर्ड बनवू शकतो, जो तोडणे खूप कठीण असेल, परंतु मला आशा आहे की तो 16,000 धावांच्या खूप जवळ येईल कसोटीमध्ये ऐवढ्या धावा काढणे ही एक मोठी उपलब्धी असेल.”
जो रूटच्या (Joe Root) च्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 148 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 270 डावात फलंदाजी करताना त्याने 51.27च्या सरासरीने 12,716 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 64 अर्धशतकांसह 35 शतके झळकावली आहेत.
हेही वाचा-
IND vs NZ : शतक झळकावूनही सरफराजला बाकावर बसावे लागणार, राहुलला मिळणार आणखी संधी!
Champion’s Trophy; पीसीबीने आयसीसीला सांगितली नवी योजना!
फक्त रिषभ पंतच नाही, तर हे 6 खेळाडू देखील झालेत 99 धावांवर बाद!