---Advertisement---

ऍलिस्टर कूकचा कठोर निर्णय! लवकरच खेळणार शेवटचा क्रिकेट सामना

Alastair Cook
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूक याने गुरुवारी (21 सप्टेंबर) मोठा निर्णय घेतल्याचे समजते. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आता क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होत आहे. काऊंटी क्रिकेटचा चालू हंगाम संपल्यानंतर कूप पुन्हा कधीही क्रिकेट खेळताना दिसणार नाहीये. असे असले तरी, अद्याप याबाबत कुठलीच अधिकृत घोषणा झाली नाहीये.

ऍलिस्टर कूक (Alastair Cook) इंग्लंड क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक राहिला आहे. 2018 मध्ये त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला शेवटचा सामना भारताविरुद्ध कसोटी प्रकारात खेळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना कूकचे वय अवघे 33 वर्ष होते. त्यानंतर कूक देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता. पण चालू महिन्याच्या शेवटी तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. कूक काऊंटी संघ एसेक्सचा महत्वाचा खेळाडू राहिला आसून संघ हंगामातील आपला शेवटचा सामना नॉर्थऍम्पटनशायर संघाविरुद्ध 26 ते 29 सप्टेंबर यादरम्यान खेळणार आहे. सध्या कूकचा संघ ऍम्पशायरविरुद्ध खेलत आहे. हा सामना 19 सप्टेंबर रोजी सुरू झाला असून 22 सप्टेंबर रोजी संपेल. पहिल्या डावात कूप एकही धाव न करता तंबूत परतला. ऍसेक्सने या सामन्यातील पहिल्या डावात 9 बाद 447 धावा केल्या आहेत.

कूक शांतपणे निवृत्त होण्याच्या विचारात असला, तरी ऍसेक्स संघ आपल्या दिग्गज फलंदाजासाठी हंगामातील शेवटच्या सामन्यात खास प्रदर्शन करू इच्छित आहे. शेवटच्या सामन्यात विजय मिळवून कूकला निरोप देण्याचा प्रयत्न ऍसेक्स संघाचा आहे. 38 वर्षीय कूकने यावर्षी काऊंटी हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 808 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 38 ची राहिली.

कुकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला तर त्याने इंग्लंडसाठी 161 कसोटी सामन्यांमध्ये 12472 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 92 सामन्यांमध्ये 32.4 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कूक अवघे चार सामने खेळला आणि 61 धावा केल्या. कुकने कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध सप्टेंबर 2018 मध्ये खेळला. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 71, तर दुसऱ्या डावात 147 धावा केल्या होत्या. इंग्लंडने 118 धावांनी भारताविरुद्धचा हा सामना जिंकला आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा कूक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. (Alastair will retire from all forms of cricket)

महत्वाच्या बातम्या – 
Asian Games । भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, मलेशियाविरुद्ध भारतीय महिला फलंदाजांचा धमाका
सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---