क्रिकेटमध्ये अनेकदा विविध मनोरंजक आकडेवारी पहायला मिळते, योगायोग पहायला मिळतो. पण जन्मतारखेएवढ्याच धावा असा विचित्र योगायोग क्वचितच पाहायला मिळतो. असा योगायोग झालायं इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ऍलेक स्टिवर्ट यांच्याबरोबर. आज (८ एप्रिल) त्यांचा ५९ वा वाढदिवस आहे.
ऍलेक स्टिवर्ट यांनी १३३ कसोटी आणि १७० वनडे सामना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खेळले आहेत. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९६३ (८-४-६३) ला झाला आहे आणि त्यांनी कसोटीमध्ये त्यांच्या जन्मतारखेएवढ्याच म्हणजेच ८४६३ धावा केल्या आहेत. जन्मतारखेएवढ्याच कसोटी धावा असणारे ते पहिलेच खेळाडू आहेत.
त्यांनी १९८९ ते २००३ या १३ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. या या काळात इंग्लंड संघातील नियमित सदस्यही होते. तसेच त्यांनी या काळात यष्टीरक्षणाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे ४५१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले लखनऊचे फलंदाज; ४ विकेट्स गमावत खेळ केला खल्लास