---Advertisement---

भारतीय महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी, जिंकले सात सुवर्ण; नागपूरच्या अल्फियाचा समावेश

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 12:00 AM
---Advertisement---

संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनंतर क्रीडाक्षेत्र ‌पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. युरोपमध्ये सर्व नियमांची अंमलबजावणी करत विविध जागतिक स्पर्धा सुरू आहेत. त्याचवेळी भारतासाठी पोलंड येथून एक आनंदाची बातमी आली आहे. पोलंडच्या किल्स येथे झालेल्या वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सने वर्चस्व राखून सात सुवर्णपदके जिंकली. सात महिला बॉक्सर्सनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरी गाठली होती. या सात महिला बॉक्सर्समध्ये नागपूरची अल्फिया पठाण हिचा देखील समावेश आहे.

अल्फियाची ऐतिहासिक कामगिरी
नागपूरची रहिवासी असलेली एकोणीस वर्षीय अल्फिया प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाली होती. तिने ८१ किलो पेक्षा जास्त वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात तुलनेने अधिक अनुभवी असलेल्या मोल्दोवाच्या दारिया कोजोरेज हिच्यावर ५-० असा एकतर्फी विजय मिळविला. हे तिचे वरिष्ठ गटातील पहिले जागतिक पदक आहे. यापूर्वी ती ज्युनियर आशियाई चॅम्पियन राहिली आहे.

या विजयानंतर प्रतिक्रिया देताना अल्फिया म्हणाली, “देशासाठी सुवर्णपदक जिंकून मी जगातील सर्वोच्च स्थानी गेल्याची अनुभूती घेत आहे. माझ्या कठोर परिश्रमांना शेवटी यश आले. अंतिम सामन्यातील ५-० विजयाने मी अत्यंत उत्साहित आहे. स्पर्धेतील सर्व सामने चांगले राहिले. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.”

या खेळाडूंनी जिंकली सुवर्णपदके
गीतिका (४८ किलो), बेबीरोझीसन चानू (५१ किलो), पूनम (५७ किलो), विंका (६० किलो), अरुंधती चौधरी (६९ किलो), थोकचॉम सनमचू चानू (७५ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा जास्त) यांनी ही सुवर्णपदके जिंकली. भारतीय महिलांनी रशियाला पछाडत सांघिक सुवर्णपदकदेखील आपल्या नावे केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Asian Wrestling Championship: भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने जिंकले सुवर्ण पदक, तर बजरंग पुनिया ठरला रौप्य पदकाचा मानकरी

लवकरच मॅराडोनाची जादू झळकणार मोठ्या पडद्यावर, ॲमेझॉनने लॉन्च केला वेबसिरीजचा टिझर

दोन संघांच्या चाहत्यांमध्ये पेटला वाद, केली जबरदस्त मुक्क्यांची बरसात; पाहा लाईव्ह सामन्यातील ढिशुम ढिशुम!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---