सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक वादग्रस्त घटना घडली, जी आता सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. ही घटना अल्जेरियाची बॉक्सर इमान खलीफशी संबंधित आहे. इमान ट्रान्सजेंडर असून ती 2023 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जेंडर इलिजिबिलीटी टेस्ट पूर्ण करू शकली नव्हती. यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं होतं. मात्र यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लिंगभेद मानण्यात आलेला नाही, त्यामुळे तिला स्पर्धेत प्रवेश मिळाला.
आता हिच इमान खलीफ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंग इव्हेंटमध्ये उतरली आहे. गुरुवारी (1 ऑगस्ट) तिचा सामना इटलीची बॉक्सर एंजेला कारिनी हिच्याशी होता. खलीफनं हा सामना अवघ्या 46 सेकंदात जिंकला, कारण एंजेलानं नाकाला दुखापत झाल्यानं सामना अर्धवट सोडून माघार घेतली. मात्र तिनं म्हटलं आहे की, ती हा सामना पराभूत झाली नाही व ती स्वत:ला विजेती मानते.
या सामन्यानंतर सोशल मीडियावर #IStandWithAngelaCarirni ट्रेंड करत आहे. टेस्लाचे सीईओ आणि ‘X’ चे मालक इलॉन मस्क यांनी देखील एंजेलाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.
वास्तविक, पॅरिस ऑलिम्पिकच्या 6व्या दिवशी महिला बॉक्सिंगच्या 66 किलो ग्रॅम कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडमध्ये इमान खलीफ आणि एंजेला कारिनी आमनेसामने होते. खलीफनं हा सामना अवघ्या 46 सेकंदात जिंकला. खलीफानं एंजेलाच्या नाकावर इतक्या जोरानं ठोसा मारला, की त्यामुळे एंजेलाच्या नाकाला दुखापत झाली आणि तिला सामना अर्ध्यातच सोडावा लागला. सामन्यादरम्यान एंजेला रडायला लागली होती. एवढंच नाही तर, सामना झाल्यानंतर एंजेलानं खलीफशी हस्तांदोलन देखील केलं नाही.
गेल्या वर्षी खलीफ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचली होती. मात्र फायनलपूर्वी तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं. तपासणीत तिचा पुरुष टेस्टोस्टेरनचा स्तर जास्त आढळून आला होता. यापूर्वी तिनं 2022 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.
हेही वाचा –
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप, एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी बक्षीस रक्कम
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस