आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ चा २२ वा (ICC Women ODI World Cup 2022) सामना भारत विरुद्ध बांगलादेश (INDW vs BANW) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ सामना असणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या अपेक्षा उंचावतील. याउलट हा सामना गमावल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यातीतून बाहेरही होऊ शकतो.
भारतीय संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ५ सामने खेळले असून त्यापैकी २ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. तर बांगलादेशच्या संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले असून त्यापैकी १ सामना जिंकला आहे आणि ३ सामने गमावले आहेत.
अशात प्रश्न हा आहे की, भारत आणि बांगलादेश संघातील सामना कधी, कुठे आणि किती वाजता होईल?, तसेच हा सामना टीव्हीवर आणि ऑनलाईन कसा पाहाता येईल?, याबाबतची पूर्ण माहिती घेऊ (All Details About INDW vs BANW Match) या बातमीतून…
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना केव्हा होणार आहे?
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना मंगळवारी (२२ मार्च) होणार आहे.
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना कोठे होणार आहे?
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क स्टेडियमवर होणार आहे.
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना किती वाजता होणार आहे?
भारत विरुद्ध बांगलादेश संघातील विश्वचषक सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३० वाजता होणार आहे. तत्पूर्वी ६ वाजता नाणेफेक होईल.
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना टीव्हीवर कसा पाहता येईल?
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या नेटवर्क चॅनलवर विविध भाषांमध्ये पाहता येईल.
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
भारत वि. बांगलादेश संघातील विश्वचषक सामना ऑनलाईन डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स महास्पोर्ट्स डॉट इनवरही मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जमधून वेगळे होण्याच्या निर्णयावर केएल राहुलचे स्पष्टीकरण, संघ सोडण्यामागचे सांगितले कारण
प्रशिक्षक मलिंगाने दाखवला धाकड फॉर्म, नेट्समध्ये यॉर्करने उडवली दांडी; Video होतोय व्हायरल