आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएल स्पर्धेत दरवर्षी काही असे खेळाडू दिसतात, जे अप्रतिम प्रदर्शनामुळे सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधत असतात. यामध्ये काही खेळाडू तुफान फलंदाजी करतात, तर गोलंदाजही मागे राहत नाहीत. आगामी हंगामात देखील काही खेळाडू असतील ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतीत. आपण या लेखात अशा पाच गोलंदाजांवर नजर टाकणार आहोत, जे आयपीएल २०२२ मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतात.
राशिद खान
अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) आगामी आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. राशिद गुजरात संघासाठी एक महत्वाचे खेळाडू ठरू शकतो. गुजरातने मेगा लिलावापूर्वी १५ कोटी खर्च करून त्याला संघात रिटेन केले होते. राशिदने आयपीएलमध्ये यापूर्वी खूप चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे आणि आगामी हंगामातही त्याच्याकडून तशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. आतापर्यंत त्याने ७६ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये ९३ विकेट्स घेतल्या आहेत.
कागिसो रबाडा
दक्षिण अफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाड (Kagiso Rabada) आगामी आयपीएल हंगामा पंजाब किंग्जसोबत खेळताना दिसणार आहे. त्याने आतापर्यंत ५० आयपीएल सामन्यांमध्ये ७६ विकेट्स घेतल्या आहेत. पंजाब किंग्जने त्याला संघात घेण्यासाठी ९.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. अशात आगामी हंगामात पंजाब किंग्जचा हा महागडा गोलंदाज त्याच्या प्रदर्शनाने संघासाठी काय कमाल करतो, हे पाहण्यासारखे असेल.
हर्षल पटेल
आयपीएच्या मागच्या हंगामात हर्षल पटेल (Harshal Patel) दमदार प्रदर्शन करणारा गोलंदाज ठरला होता. त्याने १५ सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेतल्या होत्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पटेलसाठी १०.७५ कोटी रुपये खर्च केले आणि त्याला पुन्हा संघात सामील केले. आयपीएल २०२२ मध्ये पटेल मागच्या हंगामासारखे प्रदर्शन करू शकेल की, नाही हे पाहावे लागणार आहे.
जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याची आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक हंगामात महत्वाची भूमिका पार पाडत आला आहे. त्याने मुंबईला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या १०६ सामन्यांमध्ये १३० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०१३ साली तो मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाला आणि त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने भारतीय संघात संधी मिळवली. आगामी हंगामातही तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पॅट कमिंस
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्स (Pat Cummins) याला ७.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचा एक महान गोलंदाज असला, तरी आयपीएलमध्ये त्याचे प्रदर्शन काही खास राहिलेले नाहीय. अशात केकेआरने त्याला महागात खरेदी करून एक जोखीम घेतली आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि कमिन्स त्याठिकाणी स्वतःच्या गोलंदाजीने धमाका करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
मागच्या १ वर्षात ‘या’ ४ खेळाडूंनी सोडली नाही टीम इंडियाची साथ; तरीही आयपीएलमध्ये राहिले अनसोल्ड
‘आयपीएल २०२३मध्ये विराट होऊ शकतो…’, अनुभवी फिरकीपटू अश्विनचे हैराण करणारे वक्तव्य