---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले पारस महांब्रे आहेत तरी कोण? वाचा

On: बुधवार, मे 12, 2021 9:45 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या लढतीत भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर आणि इंग्लंड दौऱ्यापुर्वी भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध जुलै महिन्यात मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे.

अशात या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणाला देण्यात येईल? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांचे नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत अजून एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे पारस महांब्रे यांचे.

स्टार स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे अतिशय महत्त्वाच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. अशात श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाच्या दुसऱ्या तुकडीसोबत नव्या प्रशिक्षकाला पाठवले जाऊ शकते. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू पारस महांब्रे यांची निवड केली जाऊ शकते. याबरोबरच देशांतर्गत क्रिकेट आणि १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची नियुक्ती केली जाण्याचीही शक्यता आहे. परंतु अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाहीये.

कोण आहेत पारस महांब्रे
पारस महांब्रे यांच्याविषयी बोलायचे झाले तर, ते भारतीय संघाचे माजी अष्टपैलू राहिले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी भारताकडून केवळ ३ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्यांनी ७ धावा आणि ३ विकेट्सची कामगिरी केली होती. तर २ कसोटी सामन्यात ५८ धावा आणि २ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु त्यांची देशांतर्गत स्तरावरील कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे.

महांब्रे यांनी लेव्हल ३ प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून प्रशिक्षण घेतले आहे. तसेच स्थानिक पातळीवर बंगाल, महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. एवढेच नव्हे तर, ते ४ वर्षे मुंबई इंडियन्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक राहिले आहेत. ते सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचे आणि इंडिया ए संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत.

राहुल द्रविड यांचाही अनुभव मोठा
राहुल द्रविड हे १९ वर्षांखालील विश्वचषक संघाचे आणि इंडिया ए संघाचे मार्दर्शक राहिले आहेत. तसेच पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांसारखे खेळाडू राहुल द्रविडच्या देखरेखीखालीच घडले आहेत. शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांसारखे खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाऊ शकतात. यातील बऱ्याचशा खेळाडूंना राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्यांच्यासाठी हा निर्णय सोईचा ठरेल.

असा असेल श्रीलंका दौरा

वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना -१३ जुलै
२)दुसरा वनडे सामना-१६ जुलै
३)तिसरा वनडे सामना -१९ जुलै
टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना -२२ जुलै
२) दुसरा टी -२० सामना -२४ जुलै
३) तिसरा टी -२० सामना -२७ जुलै

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाज म्हणून हिट; तर प्रशिक्षक म्हणून सुपरहिट, राहुल द्रविडच्या शिष्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य!

श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयची खास योजना, शास्त्री नव्हे तर ‘हा’ दिग्गज असणार संघ प्रशिक्षक?

इंग्लंड दौऱ्याचं तिकीट मिळालं; पण ‘असं’ झाल्यास मुंबईतूनच जाव लागणार घरी, बीसीसीआयच्या अटीने खेळाडू चिंतेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---