आयपीएल 2023च्या महाकुंभमेळ्याला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामापूर्वी सर्व फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. यामध्ये काही संघांनी नवीन कर्णधारांची घोषणाही केली आहे. तसेच, इतर संघ वेगवेगळ्या तयारी करत आहेत. आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी अनेक फ्रँचायझींनी त्यांच्या संघाच्या कर्णधारांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचा समावेश आहे. मात्र, तुम्हाला हे माहितीये का की, आयपीएल इतिहासात आतापर्यंत कोणत्या संघाने किती कर्णधार बदलले आहेत? चला तर या लेखातून सविस्तर जाणून घेऊया…
सर्वाधिक कर्णधार ‘या’ संघाने बदलले
आयपीएल इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक कर्णधार बदलणाऱ्या संघांच्या यादीत पंजाब किंग्स (Punjab Kings) अव्वलस्थानी आहे. पंजाबने तब्बल 14 कर्णधारांना आजमावले आहे. आयपीएल 2022मध्ये संघाची धुरा मयंक अगरवाल याच्याकडे होती. तसेच, आता आयपीएल 16 (IPL 16) हंगामात पंजाबचे कर्णधारपद शिखर धवन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. आयपीएल 2022मध्ये पंजाबने खूपच खराब कामगिरी केली होती. पंजाबला गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यांनी स्पर्धेत एकूण 14 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला होता.
याव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) असून त्यांनी 12 वेळा कर्णधार बदलले आहेत. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 9 वेळा कर्णधार बदलले असून ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी असून त्यांनी 7 वेळा कर्णधार बदलले आहेत. तसेच, संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी तीन संघ असून त्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पुणे वॉरिअर्स इंडिया (Pune Warriors India) संघांचा समावेश आहे. त्यांनी 6 वेळा कर्णधार बदलले आहेत. यानंतर चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स (Rising Pune Supergiants) संघाने प्रत्येकी 3 वेळा कर्णधार बदलले आहेत. ते संयुक्तरीत्या सहाव्या स्थानी आहेत. याव्यतिरिक्त सातव्या स्थानी डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) संघ असून त्यांनी 4 वेळा कर्णधार बदलला आहे.
आयपीएल फ्रँचायझी आणि आतापर्यंतच्या कर्णधारांची संख्या
14 – पंजाब किंग्ज
12 – दिल्ली कॅपिटल्स
9 – सनरायझर्स हैद्राबाद
7 – मुंबई इंडियन्स
7 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
6 – राजस्थान रॉयल्स
6 – कोलकाता नाईट रायडर्स
6 – पुणे वॉरियर्स इंडिया
3 – चेन्नई सुपर किंग्ज
3 – रायझिंग पुणे सुपरजायंट्स
4 – डेक्कन चार्जेस
आयपीएल 2023ची सुरुवात
आयपीएल 2023ची सुरुवात 31 मार्चपासून होणार असून स्पर्धेत एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहेत. 16व्या हंगामातील सर्व सामने 12 मैदानांवर होतील. हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. या हंगामानंतर कदाचित पुन्हा एकदा संघांना नवीन कर्णधाराची गरज पडू शकते. (all ipl franchise have changed how many captains till now ipl 2023 read here )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘म्हणूनच बायको सोडून गेली’, धवन अन् बॉलिवूड अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
बिग ब्रेकिंग! सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला झटका, दोन प्रमुख खेळाडू एकाचवेळी बाहेर