इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला पुढील महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2023 स्पर्धेसाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू एडेन मार्करम याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “प्रतीक्षा संपली आहे. आपला नवीन कर्णधार एडेन मार्करम याला नमस्कार करा.”
https://twitter.com/SunRisers/status/1628629291734040576?t=vEXOcjImxSThf_sCjHUVqQ&s=19
हैदराबादच्या या ट्वीटला 2 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, चाहते कमेंट करत एडेन मार्करम (Aiden Markram) याचे अभिनंदन करत आहेत.
दोन हंगामात तीन कर्णधार
सनरायझर्स हैदराबाद संघ मागील 2 आयपीएल हंगामात तीन कर्णधारांसोबत उतरला होता. मात्र, त्यांना संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात अपयश आले. अशात आयपीएल 16 हंगामात हैदराबादकडे दोन कर्णधारांचे पर्याय होते. एक म्हणजे एडेन मार्करम आणि दुसरा म्हणजे मयंक अगरवाल होय. मात्र, संघ व्यवस्थापनाने मार्करमकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला. मार्करम हा संघाच्या फलंदाजी फळीचा पाठीचा कणा आहे.
एडेन मार्करम आयपीएल कामगिरी
अष्टपैलू एडेन मार्करम याने आतापर्यंत फक्त 20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 40.54च्या सरासरीने आणि 134.10च्या स्ट्राईक रेटने 527 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 68 इतकी राहिली आहे. त्याने 2021 आयपीएल हंगामात पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या हंगामात त्याने पंजाबकडून 6 सामने खेळताना 29.20च्या सरासरीने 146 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याला एकही शतक करता आले नव्हते. मात्र, त्यानंतर 2022च्या हंगामात 2.6 कोटींमध्ये हैदराबादच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर मार्करमने फलंदाजीचा दम दाखवून दिला. त्याने 14 सामन्यात 47.63च्या सरासरीने 381 धावा केल्या होत्या. त्याची 3 अर्धशतके याच हंगामात आली होती.
अशात आता सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल 2023 हंगामाचे विजेतेपद मिळवून देण्यात एडेन मार्करम यशस्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Sunrisers Hyderabad Announce Aiden Markram as a new Captain in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी दिग्गजाची घसरली जीभ! बुमराहविषयी म्हणाला, ‘आयपीएल खेळला नाहीतर जग नष्ट होणार नाहीये’
ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन