Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन

ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन

February 23, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Australia-ODI-Team

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. तसेच, दोन सामने बाकी आहेत. यानंतर उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने वनडे संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 16 सदस्यीय वनडे संघाची घोषणा केली आहे. उभय संघातील वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होत आहे. या यातील पहिला सामना वानखेडे स्टेडिअम, मुंबई येथे पार पडणार आहे.

भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी दमदार संघ निवडला आहे. यावर्षी भारतात वनडे विश्वचषक 2023 पार पडणार आहे. त्यामुळे ही मालिका खूपच महत्त्वाची मानली जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) या दोन धुरंधरांचे संघात पुनरागमन होत आहे. मॅक्सवेल त्याच्या पायाच्या दुखापतीनंतर दीर्घ काळानंतर पुनरागमन करत आहे. तसेच, मार्शनेच्या टाचेवर शस्त्रक्रिया झाली होती. तोदेखील दीर्घकाळानंतर संघात परतत आहे.

🚨 JUST IN: Mitch Marsh, Glenn Maxwell and Jhye Richardson included in a strong 16-player squad for a three-game ODI series against India @LouisDBCameron | #INDvAUS

— cricket.com.au (@cricketcomau) February 23, 2023

पॅट कमिन्सच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या खांद्यावर असणार आहे. वनडे मालिकेसाठी डेविड वॉर्नर आणि ऍश्टन एगरही परतणार आहेत. वॉर्नर कोपराच्या दुखापतीमुळे मायदेशात परतला आहे. तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023)मधील उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर पडला आहे, तर ऍश्टनला या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्यामुळे तो मायदेशातील क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Cricket Australia (@cricketaustralia)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिला वनडे सामना 17 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे पार पडेल. तसेच, मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे खेळला जाईल. तिन्ही वनडे सामने दिवस-रात्र होणार आहेत. या सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार 1.30 वाजता सुरुवात होईल. (australia odi team announcement against india all rounder glenn maxwell and mitchell marsh makes comeback)

वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍश्टन एगर, ऍलेक्स कॅरे, कॅमेरून ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शोएब अख्तर 2002 सालीच बनला असता पाकिस्तानचा कर्णधार, पण कशात अडलं ते घ्या जाणून
INDw vs AUSw । फायनलमध्ये दोन पराभव आणि चिंताजनक आकडेवारी, भारतासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान कठीणच!


Next Post
Team-India

आता चुकायचं नाही! सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नडणार का टीम इंडिया? जाणून घ्या संभावित प्लेइंग XI

Jasprit-Bumrah

भारताच्या माजी दिग्गजाची घसरली जीभ! बुमराहविषयी म्हणाला, 'आयपीएल खेळला नाहीतर जग नष्ट होणार नाहीये'

Sunrisers-Hyderabad

आयपीएल! 'हा' खेळाडू करणार हैद्राबाद संघाचे नेतृत्व, संघव्यवस्थापनाकडून नावावर शिक्कामोर्तब

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143