---Advertisement---

IND vs ENG: युवराज सिंगचा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज! तिसऱ्या टी-20 कडे चाहत्यांच्या नजरा

On: मंगळवार, जुलै 7, 2026 9:16 PM
---Advertisement---


भारतीय क्रिकेटचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावरही वैभवची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ उत्सुक आहेत. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच दोन उत्तुंग षटकार मारून त्याने आपली झलक दाखवली आहे. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात वैभवच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल आणि तो दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) चा विक्रम मोडेल, अशी प्रतीक्षा चाहत्यांना आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभवचे पदार्पण झाले. त्यावेळी त्याच्यावर स्पष्ट दडपण दिसत होते. मात्र, आता तिसऱ्या सामन्यात वैभव आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करेल, अशी अपेक्षा चाहते बाळगून आहेत.

टी-20 फॉरमॅटमध्ये (T20 Format) सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम भारतीय दिग्गज युवराज सिंगच्या नावावर आहे. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्धच युवराजने केवळ 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. आता वैभव सूर्यवंशीला हा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, 15 वर्षीय वैभवने नुकतेच ‘इंडिया ए’ कडून खेळताना श्रीलंका विरुद्ध 11 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तीच लय त्याने इंग्लंडविरुद्ध कायम राखली, तर तो नक्कीच युवराजचा विक्रम मागे टाकू शकतो.

वैभव सूर्यवंशीने अत्यंत कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याच्या त्याच्या शैलीमुळे गोलंदाज सुरुवातीपासूनच दडपणाखाली असतात. तिसऱ्या सामन्यात त्याला दुसऱ्या टोकाकडून अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) भक्कम साथ मिळणार आहे. त्यामुळे वैभववर कोणतेही दडपण नसेल आणि तो इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध जोरदार कामगिरी करू शकेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---