अहमदाबाद कसोटीत भारतीय संघ 88 धावांनी आघाडीवर आहे. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलिया नाबाद 3 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात करेल. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणेच भारताने देखील मोठी धावसंख्या उभी केली. भारतासाठी विराट कोहली आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी चौथ्या सर्वाधिक धावांचे योगदान दिले. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अक्षरने आपल्या अप्रतिम फलंदाजीविषयी खास प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघासाठी चौथ्या दिवसाटी सुरुवात विराट कोहली (Virat Kohli) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी केली. जडेजाने 28 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर फलंदाजीला आलेला केएस भरत देखील 44 धावा करून तंबूत परतला. सातव्या क्रमांकावर आलेला अक्षर पटेल (Axar Patel) मात्र विराटसोबत मोठी भागीदारी करू शकला. या दोघांमध्ये तब्बल 162 धावांची भागीदारी झाली. पण अक्षरने 79 धावांवर विकेट गमावल्यामुळे ही भागीदारी तुटली. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर अक्षर त्रिफळाचीत झाला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीविषयी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांसमोर अक्षर पटेल म्हणाला, “मी माझ्या बॅटने योगदान दिल्यानंतर आनंदी आहे. माझ्या स्वतःवरचा विश्वास माझ्यात कायम आहे. मागच्या वर्षी संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न केल्याचा फायदा मला झाला. मी खराब चेंडू मारत आहे आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करत आहे.”
https://twitter.com/BCCI/status/1634854035537956869?s=20
“आमची योजना फक्त वेळ खेळत राहण्याची होती. सुरुवातील आम्ही त्यांच्या धावसंख्येचा वाठलाग करत होतो. एकदा आम्ही लक्ष्य गाठल्यानंतर ठरवले की एखादा खराब चेंडू मिळाला, तर मी तो मारायचा. एकदा फलंदाज सेट झाल्यानंतर गोलंदाजांना जास्त काही मदत मिळत नाही,” असे अक्षर पुढे म्हणाला. दरम्यान, यावर्षीच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत अक्षर पटेलची फलंदाजी जबरदस्त राहिली आहे. त्याने मालिकेत आतापर्यंत तीन अर्धशतक ठोकले असून 264 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा आणि विराट कोहलीनंतर अक्षर तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज या मालिकेत ठरला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1634874697438339073?s=20
(All-rounder Axar Patel’s reaction after scoring a fifty in the Ahmedabad Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंडची नाचक्की! दुबळ्या बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यासह केली टी20 मालिका नावे
जोड्या जबरदस्त! टीम इंडियाच्या फलंदाजांनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास, 90 वर्षात प्रथमच असं घडलं






