ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात कॅनबेरा येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचा अंतिम सामना खेळण्यात आला. शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) पार पडलेला हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, यादरम्यान एक लक्ष वेधणारी घटना घडली. यावेळी सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने 10 चेंडूत 17 धावांची खेळी साकारली. मात्र, यादरम्यान हिरोगिरी दाखवणे त्याला भलतंच महागात पडले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धपकन आपटला स्टोक्स
झालं असं की, ही घटना इंग्लंड संघाच्या (England Cricket Team) शेवटच्या म्हणजेच 12व्या षटकादरम्यान घडली. बेन स्टोक्स (Ben Stokes) याने यावेळी ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) टाकत असलेल्या चेंडूवर जोरदार फटका मारला. त्याला वाटले की, हा चेंडू सीमारेषा पार करून त्याला आणि संघाला चार धावा मिळतील. त्यामुळे तो एकदम निवांत असल्याचे दिसला, पण यादरम्यान सीमारेषेजवळील क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आणि थेट नॉन स्ट्रायकर एंडवर फेकला. बाद होण्याच्या भितीने स्टोक्स एकदम वेगाने धावू लागला. त्याचवेळी तो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धपकन आपटला.
Oh no Benjamin #AUSvENG pic.twitter.com/IautaqnIsF
— cricket.com.au (@cricketcomau) October 14, 2022
सामना रद्द
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. इंग्लंडच्या डावादरम्यान एक नाही, तर दोन वेळा सामना रोखण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान पाऊस आला आणि नंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
इंग्लंडने जिंकली मालिका
टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलिया (England vs Australia) क्रिकेट संघाला त्यांच्याच देशात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0ने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 2 विकेट्स गमावत 112 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचे पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 3.5 षटकात 3 विकेट्स गमावत 30 धावांवर खेळत होता. मात्र, पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दाखवून दिला आपला दम, ‘कॅप्टन’ बटलर मालिकावीर
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री