ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध 4 सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्सवेल म्हणाला आहे की, त्याला आयुष्यभर या गोष्टीचा खेद राहील की, तो या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. असे असले, तरीही मॅक्सवेलने यावेळी म्हटले आहे की, या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ दमदार कामगिरी करेल.
भारत दौऱ्यावरील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांचे लक्ष अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्यावर होते. मात्र, टी20 विश्वचषकानंतर लगेच तो दुखापतग्रस्त झाला. या कारणामुळे मॅक्सवेल इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत आणि बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेतही भाग घेऊ शकला नाही. आता तो भारत दौऱ्यालाही मुकणार आहे. वनडे मालिकेपूर्वी तो फिट होण्याची अपेक्षा आहे.
‘मला भारतात कसोटी न खेळण्याचा खेद राहील’
मॅक्सवेलने सांगितल्यानुसार, त्याला भारत दौऱ्यावर कसोटी संघाचा भाग होता आले नाही, याचा आयुष्यभर खेद राहील. बीबीएलच्या एका सामन्यादरम्यान माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “कदाचित मला आयुष्यभर याचा खेद राहील. माझ्या संघसहकाऱ्यांना खेळण्याची संधी मिळत आहे, हे पाहून खूप चांगले वाटत आहे. माझ्या मते हा संघ खूपच चांगला आहे.”
ग्लेन मॅक्सवेलची दुखापत
ग्लेन मॅक्सवेल एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान पडला होता. त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली होती. आता तो दीर्घ काळ क्रिकेट खेळू शकणार नाहीये. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मॅक्सवेलबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, मॅक्सवेल एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी मेलबर्नमध्ये होता. त्याचदरम्यान त्याचा अपघात झाला होता. तसेच, त्याच्या पायाला दुखापत झाली होती. दुसरीकडे, मॅक्सवेलने सांगितले होते की, त्याचे शिक्षक त्याच्या अंगावर पडले होते. त्यावेळी त्याला खूप वेदनाही झाल्या होत्या.
ग्लेन मॅक्सवेलची कारकीर्द
ग्लेन मॅक्सवेल याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ऑस्ट्रेलिया संघाकडून आतापर्यंत 7 कसोटी, 127 वनडे आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 339 धावा, वनडेत 3492 धावा आणि टी20त त्याने 2159 धावा चोपल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना कसोटीत 8 विकेट्स, वनडेत 60 विकेट्स आणि टी20त 39 विकेट्स घेतल्या आहेत. (All Rounder glenn maxwell laments missing australia test tour of india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 मालिकेआधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू थेट एनसीएमध्ये दाखल
आता सुट्टी नाही! द्विशतकानंतर शतक ठोकताच ‘या’ विक्रमात बाबर आझमच्या मांडीला मांडी लावून बसला गिल