Hardik Pandya Ruled Out: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याशी संबंधित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पंड्या आगामी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, वृत्तांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, टी20 मालिकेतून बाहेर पडला असला, तरीही हार्दिक पंड्या आयपीएल 2024 स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहे.
हार्दिक पंड्या दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर
खरं तर, आता हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला क्रिकेटपासून दूर होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान 19 ऑक्टोबर रोजी पुण्यात बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर असून दुखापतीवर उपचार घेत आहे.
Hardik Pandya ruled out of the Afghanistan T20I series.
– He will be fit for IPL 2024….!!!! pic.twitter.com/iTzN7U74nV
— Johns. (@CricCrazyJohns) December 27, 2023
आयपीएलमध्ये खेळणार मुंबईकडून
दुसरीकडे, हार्दिक पंड्या आयपीएल 2024 (Hardik Pandya IPL 2024) हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईने त्याला आयपीएल 2024 लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघाकडून ट्रेड करत आपल्या ताफ्यात सामील केले होते. एवढंच काय, तर संघाला 5 वेळा आयपीएल किताब जिंकून देणाऱ्या रोहितला हटवून हार्दिककडे संघाच्या नेतृत्वाची धुराही सोपवण्यात आली. त्यामुळे आता पंड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसला, तरीही तो आयपीएल 2024 पर्यंत फिट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत-अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला पुढील वर्षी 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 14 जानेवारी रोजी इंदोरमध्ये आणि तिसरा सामना 17 जानेवारी रोजी बंगळुरू येथे पार पडेल. या स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (all rounder hardik pandya out of t20i series against afghanistan likely to be fit for ipl 2024)
हेही वाचा-
एकच मारला, पण सॉलिड मारला! मॅक्सवेलचा 92 मीटरचा षटकार थेट स्टेडिअमच्या छतावर, व्हिडिओ पाहाच
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्याच दिवशी रबाडाने घडवला इतिहास! ‘या’ विक्रमात बनला आफ्रिकेचा फक्त 7वा गोलंदाज