टी20 विश्वचषक 2022 तोंडावर आला आहे. मात्र, या मोठ्या स्पर्धेपूर्वी काही संघांमध्ये खेळाडूंची गळती सुरू झालीये. म्हणजेच काही संघातील खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडताना दिसत आहेत. आता या सर्वांमध्ये आणखी एका संघाच्या खेळाडूचा समावेश झाला आहे. तो खेळाडू दक्षिण आफ्रिका संघाचा आहे. त्या अष्टपैलू खेळाडूचे नाव ड्वेन प्रिटोरियस आहे. तो काही दिवसांपूर्वीच दुखापतग्रस्त होऊन संघातून बाहेर पडला होता. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाला आता त्याचा बदली खेळाडू मिळाला आहे. संघाने अष्टपैलू मार्को यान्सेन याला ताफ्यात सामील केले आहे. मोठ्या उंचीचा हा खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळला आहे. तसेच, तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडूनही खेळला आहे.
ड्वेन प्रिटोरियस (Dwayne Pretorius) याचा भारतीय संघाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यादरम्यान अंगठा फ्रॅक्चर झाला होता. या कारणामुळे त्याला वनडे आणि टी20 विश्वचषक अशा दोन्ही स्पर्धांमधून बाहेर पडावे लागले. भारताविरुद्धच्या मालिकेत मार्को यान्सेन (Marco Jansen) याला तातडीने सामील करण्यात आले होते. तसेच, तो मालिकेतील अंतिम सामन्यातही खेळताना दिसला होता. आता त्याला टी20 विश्वचषकाच्या संघातही स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, यान्सेनला आधी राखीव खेळाडूंच्या यादीत सामील केले गेले होते.
SQUAD UPDATE ????
Marco Jansen has been included in the #Proteas 15-man #T20WorldCup squad. He replaces the injured Dwaine Pretorius.
Lizaad Williams has been called up to replace Jansen amongst the travelling reserves.#BePartOfIt pic.twitter.com/zbAyA8zZtc
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 12, 2022
मार्को यान्सेन याला मुख्य संघात सामील केल्यामुळे प्रवासी राखीव खेळाडूंमध्ये लिजाद विलियम्स याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत एंडिले फेहलुकवायो आणि ब्योर्न फोर्टुइन हे खेळाडूही राखीव खेळाडूंच्या यादीत आहेत.
Marco Jansen included in the South African team for the T20 World Cup 2022.
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2022
टी20 विश्वचषकाला मुकणारा ड्वेन प्रिटोरियस दुसरा दक्षिण आफ्रिकी खेळाडू
दक्षिण आफ्रिका संघासाठी ड्वेन प्रिटोरियस हा दुसरा खेळाडू आहे, जो दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार नाही. त्याच्यापूर्वी प्रमुख फलंदाज रस्सी व्हॅन डर ड्युसेन हादेखील बोटाच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ड्युसेनला इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतून तसेच टी20 विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे.
टी20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघ-
टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीजा हेन्ड्रिक्स, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रीच नॉर्किया, मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, रायली रूसो, तरबेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मॅच फिक्सिंगवर आयसीसीची कडक कारवाई, ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी
‘हमे तो अपनोने लूटा’! गांगुलींना पुन्हा व्हायचे होते बीसीसीआय अध्यक्ष? मात्र…






