जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या नावाचाही समावेश होतो. अनेक विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या डू प्लेसिस याने 2021मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो टी20 आणि वनडे क्रिकेट प्रकारात अजूनही सक्रिय आहे. तो जगभरातील टी20 लीगमध्ये भाग घेतो. त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली असली, तरीही त्याची कसोटी कारकीर्द शानदार राहिली होती. त्याने 69 सामन्यातील 118 डावात फलंदाजी करताना 4163 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत दमदार कामगिरी केली असली, तरीही डू प्लेसिसने त्या भारतीय गोलंदाजाबद्दल खुलासा केला, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याची झोप उडवली होती.
काय म्हणाला डू प्लेसिस?
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने त्या गोलंदाजाचे नाव सांगितले. डू प्लेसिसला मुलाखतीदरम्यान विचारले गेले की, त्याच्यासाठी सर्वात खतरनाक भारतीय गोलंदाज कोण होता? यावेळी त्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) किंवा आर अश्विन (R Ashwin) नाही, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे नाव घेतले. जडेजा काही वर्षे डू प्लेसिससोबत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळला आहे.
डू प्लेसिस म्हणाला की, “सईद अजमल आणि भारतात रवींद्र जडेजा यांनी माझी रात्रीची झोप खराब केली होती.”
भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा मागील काही काळापासून भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. तो एक गोलंदाज म्हणूनच नाही, तर फलंदाज आणि गोलंदाजाच्या रूपातही दमदार योगदान देत आहे. मात्र, मागील काही काळापासून तो दुखापतींमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. जडेजाच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 60 कसोटी सामन्यातील 114 डावात गोलंदाजी करताना 242 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी रेट हा 2.43 इतका राहिला आहे.
फाफ डू प्लेसिसची कारकीर्द
दुसरीकडे, डू प्लेसिसच्या वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 143 वनडे आणि 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत 5507 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20त 1528 धावा केल्या आहेत. (All Rounder ravindra jadeja gave faf du plessis sleepless nights in test matches in india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोर्डाच्या परिक्षेमुळे मुकणार होती टीम इंडियात एंट्री; आता वर्ल्ड कपमध्ये कुटल्या 161च्या स्ट्राईट रेटने धावा
भारत-श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना फ्रीमध्ये पाहायचाय? तर ही बातमी तुमच्यासाठी