---Advertisement---

अर्जून पुरस्कार मिळाल्यानंतर रविंद्र जडेजाने दिली ही प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, ऑगस्ट 30, 2019 2:55 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचा काल(29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अर्जून पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मात्र जडेजा सध्या भारतीय क्रिकेट संघाबरोबर वेस्ट इंडीज दौऱ्यावर असल्याने तो काल राष्ट्रपती भवनात झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहू शकला नाही.

पण असे असले तरी बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओद्वारे जडेजाने अर्जून पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तो म्हणाला, ‘सर्वप्रथम मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला अर्जून पुरस्कार प्रदान केला. मी पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंचेही अभिनंदन करतो. त्यांनी त्यांच्या खेळात शानदार कामगिरी केली आहे.’

‘जेव्हाही मी भारतासाठी खेळेल तेव्हा भारतीय संघाचे आणि देशाचे नाव उंचावण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच भारतासाठी खेळताना संघाला जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.’

काल जडेजाबरोबर खेळातील 32 दिग्गजांचा राष्ट्रपती भवनात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये 19 खेळाडूंना अर्जून पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर पॅरा ऍथलिट दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ या देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

क्रिकेट क्षेत्रातील जडेजासह भारतीय महिला संघाची गोलंदाज पुनम यादवलाही अर्जून पुरस्कार मिळाला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

..म्हणून एमएस धोनीची झाली नाही भारताच्या टी२० संघात निवड, एमएसके प्रसादने केला खूलासा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धोनीला संधी नाही

काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment