इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात त्यांना 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यातील दोन सामने पार पडले आहेत. अशातच क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. सॅमवर सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने या सामन्यादरम्यान टेंबा बावुमा याची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केले होते. त्यामुळेच त्याच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सामना शुल्काच्या 15 टक्के दंड
सॅम करन (Sam Curran) हा आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत कलम 2.5चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. या अंतर्गत कोणत्याही खेळाडूविरुद्ध भाषेचा वापर, कृती किंवा फलंदाजाकडून बाद झाल्यानंतर इशारा करणे आहे. पंचांनी सॅमवर आरोप लावला, जो त्यानेही मान्य केला. सॅमला एक डिमेरिट गुण मिळाला, जो 24 महिन्याच्या कालावधीत त्याचा पहिला गुण होता. यासोबतच त्याला सामना शुल्काच्या 15 टक्के दंडही ठोठावण्यात आला.
Sam Curran given 1 demerit point and fined 15% of his match fee!! Good!! #CricketTwitter
— Gills (@gpricey23) January 31, 2023
सॅम करनचे सेलिब्रेशन
ही घटना दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) संघात रविवारी (दि. 29 जानेवारी) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यानची आहे. सॅम इंग्लंडकडून 28वे षटक टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅमने टेंबा बावुमा (Temba Bavuma) याला बाद केले. तसेच, बावुमा बाद होऊन तंबूत जात होता, तेव्हा त्याच्या वाटेत येऊन सॅम करन सेलिब्रेशन (Sam Curran Celebration) करू लागला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. (all rounder sam curran fined 15 percent of match fees for excessive celebration in 2nd odi vs south africa)
सॅम करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू
विशेष म्हणजे, सॅम करन आयपीएल (Sam Curran IPl) मिनी लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा मान पटकावला. दोन कोटींची मूळ किंमत असणाऱ्या करनला पंजाब किंग्स संघाने आयपीएल 2023च्या मिनी लिलावात विक्रमी 18.50 कोटी रुपयात ताफ्यात सामील केले होते.
टेंबा बावुमाने शानदार शतक ठोकत दक्षिण आफ्रिकेला केले विजयी
विशेष म्हणजे, हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने 5 विकेट्सने आपल्या खिशात घातला. हा यजमानांचा सलग दुसरा विजय होता. या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावत 342 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार टेंबा बावुमाने यावेळी 102 चेंडूत 109 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 14 चौकारही मारले होते. त्याच्या जबरदस्त शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने हे आव्हान 49.1 षटकात गाठले. सामन्यातील कामगिरीसाठी बावुमाला सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीग: मितालीनंतर झूलन गोस्वामी बनली ‘या’ संघाची गोलंदाजी प्रशिक्षक?
Video: सभ्य लोकांच्या खेळात पाकिस्तानी गोलंदाजाचे लाजीरवाणे कृत्य; आधी फलंदाजाला दिला धक्का अन् मागून…