न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 21 धावांनी पराभव पत्करला. भारतीय संघाला पहिल्या टी20 सामन्यात पराभूत करून न्यूझीलंडने मालिकेत 1-0ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचे अनेक मॅचविनर खेळाडू फ्लॉप ठरले. मात्र, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने या पराभवाविषयी परखड मत मांडले आहे. तसेच, त्याने भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत दमदार पुनरागमन करेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टनचे वक्तव्य
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, “माझा विश्वास आहे की, हे फक्त एका सामन्यापुरते मर्यादित आहे. खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळाल्यामुळे असे झाले, याच्याशी मी सहमत नाही. तसेच, आम्हाला कोणत्या विभागात सुधारणा करण्याची गरज आहे, असेही मला वाटत नाही. ही फक्त एका सामन्याची गोष्ट आहे.”
https://twitter.com/BCCI/status/1619017179793588224
पुढे बोलताना सुंदर म्हणाला की, “जर आम्ही वेगवान किंवा चांगली सुरुवात केली असती, तर गोष्टी यापेक्षा वेगळ्या होऊ शकल्या असत्या. निश्चितरीत्या खेळपट्टीवर चेंडू वळण घेत होता, आणि तुम्हाला नेहमी अशी खेळपट्टी पाहायला मिळते.”
यापूर्वीही अशा खेळपट्टीवर खेळलेत भारतीय
“आमच्या संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये आणि इतकेच नाही, तर भारतीय संघाकडूनही यासारख्या खेळपट्टीवर खेळत आले आहेत. त्यामुळे हे फक्त एका सामन्यापुरते होते, ज्यामध्ये काही गोष्टी आमच्या बाजूने नव्हत्या,” असे पुढे बोलताना सुंदर म्हणाला.
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, भारतीय संघाच्या वरच्या फळीत बदल करण्याची गरज आहे का? यावर तो म्हणाला की, “तुम्हाला वास्तवात असं वाटतं का की, बदल करण्याची गरज आहे? जर तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये तुमच्या आवडीची बिर्याणी मिळाली नाही, तर तुम्ही कधीच रेस्टॉरंटमध्ये जाणार नाहीत का?”
“त्या सर्वांनी इतक्या धावा केल्या आहेत. ते फक्त एक दिवस चांगले खेळू शकले नाहीत. असे कुणासोबतही होऊ शकते. इतकेच नाही, तर न्यूझीलंड संघही रायपूरमध्ये दुसऱ्या वनडेत 108 धावांवर बाद झाला होता,” असेही तो म्हणाला.
संघात होणार नाही बदल
पुढे बोलताना सुंदरने संघातील बदलाविषयी म्हटले की, “याचा अर्थ असा नाही की, आम्हाला आमच्या वरच्या फळीत बदल करायचा आहे. हा खेळ आहे आणि असे कुणासोबतही होऊ शकते. आम्हाला धैर्य कायम ठेवले पाहिजे. खेळात दोन्ही संघ जिंकू शकत नाहीत. किंवा सर्व 22 खेळाडू चांगली कामगिरी करू शकत नाहीत. त्या सर्वांनी कधी ना कधी चांगली कामगिरी केली आहे.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. (all rounder washington sundar on indian cricket team loss shubman gill ishan kishan top order)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटचा सगळ्यात मोठा मॅचविनर टी20त ठरतोय फ्लॉप, करिअर येणार धोक्यात?
सगळं खोटं! ना 50 कोटींचा बंगला, ना महागड्या गाड्या; राहुल-अथियाला लग्नात दमडीही मिळाली नाही






