---Advertisement---

पहिल्याच कसोटी सामन्यात बॅटिंग- बॉलिंगमध्ये ‘सुपर’ कामगिरी करणारे भारतीय, ‘ही’ आहेत नावे

On: रविवार, जानेवारी 17, 2021 3:24 PM
---Advertisement---

ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना सुरु असून आज (१७ जानेवारी) सामन्याचा तिसरा दिवस होता. यादिवशी सकाळचे सत्र संपेपर्यंत भारताचे अर्ध्याच्या वर खेळाडू तंबूत परतल्याने संघाची गाडी डगमगली होती. परंतु खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदर याने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. यासह एक नवा विक्रम सुंदरच्या नावावर झाला आहे.

पदार्पणात ३ विकेट्स आणि अर्धशतकापेक्षा जास्त धावा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव ३६९ धावांवर गुंडाळण्यात सुंदरने मोलाचा वाटा दिला होता. यावेळी त्याने ८९ षटके गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा त्याचा पहिला शिकार बनला. तर पुढे कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लायन यांना त्याने त्रिफळाचीत केले.

पुढे फलंदाजी करताना सुंदरने १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. अखेर मिचेल स्टार्कने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले.

अशाप्रकारे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात एका डावात ३ विकेट्स आणि ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा सुंदर तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापुर्वी सक्रिय क्रिकेटपटू हनुमा विहारी आणि माजी दिग्गज दत्तू फाडकर यांनी ही खास कामगिरी केली होती.

फाडकर यांनी १९४७ मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना त्यांनी ५१ धावा केल्या होत्या. ९७ चेंडूत ४ चौकार मारत त्यांनी ही खेळी केली होती. तर पहिल्याच डावात गोलंदाजी करताना १४ धावांवर ३ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यांनी केली होता.

तर विहारीने २०१८ मध्ये केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यातील पहिल्या डावात विहारीने फलंदाजी करताना ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. सोबतच दुसऱ्या डावात त्याने ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या डावाखेर ५४ धावांनी आघाडीवर

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मार्कस हॅरीस याने १ धाव आणि डेविड वॉर्नर याने २० धावांची नाबाद खेळी केली. यासह तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया संघ ५४ धावांनी आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test : तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा; ऑस्ट्रेलियाकडे ५४ धावांची आघाडी

वय छोटे पण पराक्रम मोठे! वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू कामगिरीसह केला ‘हा’ खास विक्रम

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शार्दुलचा दे घुमा के! इरफान-अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---